जनता महाविद्यालयातील प्रा अनिल कोलते यांना पी एच डी

माका प्रतिनिधी
दत्तात्रय शिंदे
नेवासा – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या
प्रसारक समाज अहमदनगर या संस्थेचे जनता
कला व विज्ञान महाविद्यालय रुईछत्तीसी येथील
वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनिल रामधन
कोलते यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाकडून P.H.D प्रदान
करण्यात आली.
त्यांनी लसणाचे बुरशीजन्य रोग आणि त्यांचे
व्यवस्थापन या विषयावर शोध प्रबंध सादर केला
होता. त्यांना कडा येथील गांधी महाविद्यालयाचे
प्रा. डॉ. एस. एस. पाताळे सर यांचे मार्गदर्शन
लाभले.
या बद्दल त्यांचे संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष
नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष आर. एच. दरे,
सचिव जी. डी. खानदेशे, विश्वस्त मुकेश दादा मुळे
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. बाबर
सर व डॉ. बी. ए. पाटील, डॉ. सोनवणे बी. एन.,
डॉ. काळे एस. आर., डॉ. स्वाती वाघ, प्रा. सरला
कोलते, प्रा. पाटोळे के. एन., देविदास बोरुडे, सुनिल
कोलते, महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक
आदींनी अभिनंदन केले आहे