जिल्हा परिषदेने श्वेतपत्रिका काढावी -माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रशासक राज आहे. त्यातच सरकारमध्ये सातत्याने होणाऱ्या फेरबदलामुळे काही अधिकारी यांचा गैरफायदा घेत मंत्र्यांची कारणे पुढे करत मनमानी करत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. येरेकर यांची सुजित झावरे पाटील यांनी भेट घेतली तसेच संबंधित खातेप्रमुखांना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या दालनामध्ये बोलावले. शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीच्या निविदा कालावधी संपून महिना उलटून गेला आहे. तरी संबंधित अधिकारी निविदा विशिष्ट ठेकेदाराला काम मिळत नाही म्हणून निविदाच उघडत नाही.
सदर बाब अत्यंत गंभीर असून शासन निर्णयाची पायमल्ली जिल्हा परिषदमध्ये बांधकाम व पाणीपुरवठा विभागाकडून होत असल्याचे निदर्शनास दिसून येत आहे.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन दिवसात कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्हा परिषद सेस, १५ वा वित्त आयोग, एकूण अनुदानाच्या व्याजाचे नियोजन करून याबाबत जिल्हा परिषदेने श्वेतपत्रिका काढावी अशी देखील मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी यावेळी केली आहे.