रामदास फुले यांच्यामुळे नेप्तीचे नाव देशभर -आ. निलेश लंके

अहमदनगर (प्रतिनिधी)-
नेप्ती (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांनी काही दिवसापूर्वी फ्लेमिंगो पक्षाला कुत्र्यांच्या तावडीतून जीवाची परवा न करता वाचवून जीवदान दिल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
आ. निलेश लंके यांच्या शहरातील संपर्क कार्यालयात फुले यांचा सत्कार सोहळा थाटात पार पडला. यावेळी नेप्तीचे माजी उपसरपंच शिवाजी होळकर पाटील, मा.सरपंच दिलीपराव होळकर, शिवसेनेचे जालिंदर शिंदे, सरपंच संजय जपकर, अंबादास पुंड, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष निखील शेलार, समता परिषदेचे शाखाध्यक्ष शाहूराजे होले, मार्केट कमिटीचे माजी संचालक वसंत पवार, आ. निलेश लंके प्रतिष्ठानचे तुषार भुजबळ, महेंद्र चौगुले, संभाजी गडाख, दादू चौगुले, पारनेर मार्केट कमिटीचे चेअरमन बाबाजी तरटे, माजी जि. प.सदस्य मधुकर उचाळे, आ. लंके यांचे स्विय सहाय्यक शिवा कराळे, सत्तार सय्यद ,नितीन कदम भानुदास फुले, प्रा. एकनाथ होले, प्रा. भाऊसाहेब पुंड, अकोळनेरचे अविनाश जाधव, निमगाव वाघ्याचे भरत बोडके ,नवनाथ गायकवाड, विळदचे अमोल कांबळे, शेंडीचे प्रविण वारुळे, जखणगावचे तात्याभाऊ कर्डिले, अनिल गंधाटे ,समता व सावता परिषदेचे तसेच आ .निलेश लंके प्रतिष्ठानचे नगर ,पारनेर तालुक्यातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार निलेश लंके म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांचे 25 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, क्रीडा व धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य प्रेरणादायी आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नगर तालुका अध्यक्ष रामदास फुले गेल्या काही वर्षापासून ओ.बी.सी.च्या मागण्या व प्रश्न समता परिषदेचे संस्थापक कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोडत आहेत .समता परिषदेच्या माध्यमातून फुले यांनी स्वच्छ भारत अभियान वृक्षारोपण रक्तदान, आरोग्य शिबिरातून त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे .मुलगी वाचवा मुलगी शिकवा समाजातील वंचित घटकासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने ते कार्य करतात या आधीही अनेक संघटनेने त्यांचा सन्मान केलेला आहे .धावपळीच्या व महागाईच्या काळात माणुसकीचे भावनेने त्यांनी अनेक गरजूंना आरोग्य सुविधा दिल्या आहेत. तर पशु-पक्ष्यांवर प्रेम करुन त्यांचे जीव वाचविण्याचे त्यांचे कार्य केले आहे. रामदास फुले मुळे नेप्तीचे नाव देशभर झाले आहे .फुले यांना पुरस्कार मिळवून देण्यासाठी मी राज्य शासनाला विनंती करणार असून शासनाने त्यांना त्वरित पुरस्कार द्यावा असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले आहे.
रामदास फुले म्हणाले की, स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. व्यसनमुक्तीचे उपक्रम राबवून युवकांना दिशा देण्याचे कार्य सुरु आहे. तर महिला सक्षमीकरणासाठी देखील प्रयत्न सुरु आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पद्मश्री पोपट पवार यांची प्रेरणा घेऊन समाजकार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.