सर्वोदय विदया मंदिर राजूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.

आदिवासी निसर्गाचे रक्षण करणारा जबाबदार घटक -टि.एन.कानवडे.
अकोले/प्रतिनिधी –
आदिवासी बांधव सुरक्षित असेल तरच जंगल सुरक्षित राहील.जंगल सुरक्षित राहिले तर पर्यावरण टिकेल.याच पर्यावरणावर संपुर्ण जग सुरक्षित आहे. म्हणूनच आपला आदिवासी बांधव निसर्गाचे रक्षण करणारा एक जबाबदार घटक असल्याचे विचार सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टि.एन. कानवडे यांनी व्यक्त केले.
मर्दाच्या छातीचा लेक होता तो काळया मातीचा,राघोजी म्हणतात त्याला इंग्रजांना घाम फोडणारे, मि आदिवासी राणी हाय कोणाच्या बापाला घाबरत नाय या गीतांवर ठेका धरत, लेक्षीम, झांज पथक,ढोल, ताशाचा गजर,स्काऊड गाईड संचलन, पारंपारीक आदिवासी वेशभुषा यांसह
एकतीर एक कमान, सर्व अधिवासी एक समान,ऑगस्ट क्रांती दिनाचा विजय असो,बिरसा मुंडाने पुकारा है भारत देश हमारा है, जब तक सुरज चाँद रहेगा बिरसा तेरा नाम रहेगा या घोषणा देत राजूर येथील गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात जागतिक आदिवासी दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टि.एन. कानवडे हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी संचालक विजय पवार,विलास पाबळकर, प्राचार्य भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य आण्णासाहेब धतुरे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी, यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष टि.एन.कानवडे यांनी पुढे मार्गदर्शन करताना जल, जमिन,जंगल वाचवण्याचे काम आदिवासी बांधवांनी केले.आद्य क्रांतीविरांनी संरक्षणासाठी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.यासाठी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो.म्हणून आपल्या बांधवांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू असे विचार प्रतिपादीत केले.
प्राचार्य भाऊसाहेब बनकर,शिक्षक श्रीकांत घाणे, विदयार्थीनी दिक्षा मुठे आदिंनी आदिवासी दिनाचे महत्त्व तसेच क्रांतिकारकांचे विचार या विषयी प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक पाचपुते यांनी केले. सुत्रसंचलन धनंजय पगारे यांनी केले. तर संजय व्यवहारे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विदयार्थी यांनी परिश्रम घेतले.
