इतर

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस बँकटेक अवॉर्ड

संगमनेर ( प्रतिनिधी )

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेस यावर्षीचा बँकटेक अवॉर्ड हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.

अहिल्यानगर जिल्हा बँक असोसिएशनच्या कार्यक्रमामध्ये बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हा.चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे, संचालक ॲड. लक्ष्मणराव खेमनर, अण्णासाहेब शिंदे,कचरू फड,  किसनराव वाळके, शांताराम फड यांनी हा पुरस्कार GS महानगर बँकेच्या चेअरमन श्रीमती गीतांजली शेळके व अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, असोसिएशनचे अध्यक्ष सत्यन मुंदडा यांच्या शुभहस्ते स्वीकारला.

या व्यतिरिक्त या बँकेस एनपीएच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल बिंग अवॉर्ड हा पुरस्कार तर सर्व कर्मचाऱ्यांना वारंवार दिलेल्या प्रशिक्षणा बद्दल  बिट्स अवॉर्ड हा पुरस्कार देखील प्राप्त झाला.

यावेळी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी सहकारी बँकेने गेल्या वर्षभरामध्ये बँकेमध्ये खूप चांगले तांत्रिक बदल केलेले आहे. यामध्ये डिजिटल पेमेंट, एटीएम, क्यू आर कोड तसेच वसुली करीता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर इत्यादी बदल यशस्वीरित्या केलेले आहेत. बँकेने नेट एनपीए शून्य टक्के राखण्यात यश मिळवलेले आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये येणाऱ्या बदलास सामोरे जाण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण बँकेतर्फे देण्यात येत आहेत. या सर्व गोष्टींमुळेच बँकेचा व्यवसाय १०८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे.

तर नानासाहेब शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात व राज्यात बँकिंग क्षेत्रामध्ये अमृतवाहिनी बँकेने मोठा नावलौकिक निर्माण केला आहे.

बँकेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल मार्गदर्शक माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात मा.आमदार डॉ.सुधीर तांबे,आमदार सत्यजित  तांबे, युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात , सौ दुर्गाताई तांबे,इंद्रजीत भाऊ थोरात, रणजीतसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, पांडुरंग पाटील घुले, यांच्यासह विविध मान्यवरांनी बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलेले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button