नेप्तीतील रामदास फुलेंचे माजी मंत्री राम शिंदे यांनी केले कौतुक!

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले हे मागील 25 वर्षापासून निस्वार्थपणे करत असलेल्या उल्लेखनीय समाजकार्याबद्दल यांचा माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सन्मान केला.
रामदास फुले सातत्याने सामाजिक कार्यात योगदान देत आहे. तर वंचित व गरजू घटकातील नागरिकांचे प्रश्न सोडवत आहे. ओ.बी.सी.च्या मागण्या व प्रश्नावर सातत्याने ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून सुरु असलेल्या चळवळीत ते योगदान देत आहे. स्वच्छ भारत अभियान वृक्षारोपण रक्तदान, आरोग्य शिबिरातून त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे .मुलगी वाचवा मुलगी शिकवा समाजातील वंचित घटकासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने ते कार्य करत आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल शिंदे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
रामदास फुले यांनी ग्रामीण भागात काम करताना अनेक अडचणी येतात. या अडचणींवर मात करुन समाजकार्य सुरु आहे. सामाजिक परिवर्तनासाठी व समाजामध्ये जागृती आणण्याच्या उद्देशाने स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षरोपण, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, व्यसनमुक्ती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी स्पष्ट केले.