शेवगाव तालुक्यातील हातगाव सह २८ गावाच्या नागरिकांना लवकरच पिण्याचे पाणी मिळणार -हर्षदाताई काकडे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील हातगाव सह २८ गावाच्यायोजनेतील गावांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन पूर्ण होऊनही अनेक वर्ष उलटली परंतु तरी देखील या योजनेतील गावांना पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरु होती. दुष्काळी पट्ट्यातील ही गावे असल्याने धरण उशाला व कोरड घशाला अशी या योजनेतील गावांची परिस्थिती होती. परंतु ही परिस्थिती आता बदलणार असून सोनेसांगवी येथील ग्रामस्थांना आता जलजीवन मिशन योजनेतून लवकरच पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांनी सोनेसांगवी येथे केले.
आज दि.(२३) रोजी सोनेसांगवी येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन व टाकीचे बांधकाम करणे कामाचा शुभारंभ जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी पुढे बोलतांना सौ.काकडे म्हणाल्या की, या योजनेतील बेलगाव, सोनेसांगवी, वरखेड, अंतरवाली बुद्रुक, मुर्शदपुर, लखमापुरी, सोनविहिर या गावांचा समावेश जलजीवन मिशन योजनेत व्हावा म्हणून वरील गावांतील नागरिकांनी जनशक्तीच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांना दि.०७ जून २०२२ ला भेटून याबाबत निवेदन दिले होते. तसेच जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आशिष येरेकर यांचीही दि.०९ जून २०२२ रोजी भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्यानंतर जीवन प्राधिकरण नगर येथील मुख्य कार्यालयावरती बैठा सत्याग्रह आंदोलनाचा इशारा देताच कार्यकारी अभियंता यांनी शेवगाव येथे अभियंता मृणाल धगधगे यांची टीम पाठवून आंदोलन कर्त्यांना शेवगाव येथेच गाठून या गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करू असे लेखी आश्वासन दिले होते. त्यास मंजुरी मिळाली असून जनशक्ती व वरील गावांतील ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले असून आता वरील गावातील ग्रामस्थांचा पिण्याचे पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. येथील नागरिकांनी चिवटपणे यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा प्रश्न सुटला असल्याचेही यावेळी सौ.काकडे बोलतांना म्हणाल्या.
यावेळी सरपंच रामकिसन मडके, बाबासाहेब मडके, बबन आंधळे, गणेश वंजारी, देविदास मडके, अब्बास पठाण, अरुण आंधळे, बाबुशा मडके, विठ्ठल मडके, मनोहर आंधळे, संदीप मडके, रामजी मडके, उत्तम वंजारी, योगेश मडके, अण्णासाहेब आंधळे, हनुमान मडके, सागर आंधळे, अक्षय आंधळे, विजय आंधळे, बप्पासाहेब मडके, ऋषिकेश मडके, संतोष आंधळे, परमेश्वर आंधळे, यासह ग्रामस्थ मोठ्यासंखेने उपस्थित होते.