ग्रामीण

अकोले नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी बाळासाहेब वडजे बिनविरोध !

अकोले (प्रतिनिधी) —

अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बाळासाहेब वडजे यांची बुधवारी बिनविरोध निवड  करण्यात आली.

 नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला .त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी बाळासाहेब वडजे यांचा एकमेव अर्ज आला होता.त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नगरसेविका शितल वैद्य तर अनुमोदक म्हणून नगरसेवक शरद नवले यांनी स्वाक्षरी केली .निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायत सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत बाळासाहेब वडजे यांची अविरोध निवड  झाल्याचे घोषीत करण्यात आले

नूतन नगराध्यक्ष श्री वडजे हे माजी मंत्री मधुकरराव पिचड माजी आमदार वैभवराव पिचड यांचे ते खंदे समर्थक आहे श्री.वडजे यांच्या निवडीची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

यावेळी नूतन  नगराध्यक्ष  बाळासाहेब वडजे,नगरसेवक शरद नवले,विजय पवार ,सागर चाैधरी,नवनाथ शेटे,आरिफ शेख,प्रदिप नाईकवाडी,साै.वैष्णवी धुमाळ, साै.कविता शेळके,साै.तमन्ना शेख,साै.माधुरी शेणकर,साै.जनाबाई मोहिते,  श्वेताली रुपवते, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे  आदी उपस्थित होते.

 निवडीनंतर अकोले भाजपा कार्यालयात सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित  नगराध्यक्ष  बाळासाहेब वडजे,यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड,तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अ ता एज्यु सोसायटीचे अध्यक्ष इंजि.सुनील दातीर,सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, माजी सेक्रेटरी यशवंतराव आभाळे,अमृतसागर दूध संघाचे संचालक आनंदराव वाकचौरे, आप्पासाहेब आवारी,गंगाधर नाईकवाडी,भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल देशमुख, सी बी भांगरे,राजेंद्र देशमुख,प्रतिथयश व्यापारी किसनराव लहामगे, रामनिवास राठी,बाळासाहेब सावंत,मच्छिद्र मंडलिक, सचिन जोशी,अशोक आवारी,अमोल वैद्य,बबलू धुमाळ, सचिन शेटे, परशराम शेळके,मोहसिन शेख,रविंद्र शेणकर,नवनाथ मोहिते, नानासाहेब नाईकवाडी,सुनील देशमुख,निलेश देशमुख,डॉ विराज शिंदे,संजय जाधव, अनिल गायकवाड,संपत गायकवाड, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे पक्षाच्या वतीने फेटे बांधून शाल देऊन सत्कार करण्यात आला.

भाजपचे कमळ फुलवा — वैभवराव पिचड

 यावेळी बोलताना माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले-मागील काळात आपल्या पक्षाचे सरकार नसल्याने नगरपंचायतला निधी आणण्यास अडचणी येत होत्या आता आपल्या पक्षाचे सरकार आहे त्यामुळे सरकारच्या माध्यामातून नगरपंचायतसाठी  भरपूर निधी आणता येणार आहे त्यामुळे आलेला निधी लवकर खर्ची करा,  बाळासाहेब वडजे तुम्ही आता नगराध्यक्ष म्हणून शहर विकासाचे कामास जोमाने सुरुवात करा,पुढील वेळेस ही अकोले नगरपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले पाहिजे यापद्धतीने आपण शहर विकासाच्या कामाला लागा असे सांगितले, देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेद्र मोदी व्हावेत व  राज्यात आपल्या  भारतीय जनता पार्टीची सत्ता व  तालुक्यात भाजपाचा आमदार व्हावा असे प्रत्येकाला वाटते त्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सामान्य माणसापर्यत पोहचवले पाहिजे. अशा सुचना  वैभवराव पिचड यांनी केल्या .

अकोले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध। -नगराध्यक्ष श्री वडजे

  यावेळी नूतन नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे म्हणाले कीं माजी मंत्री मधुकरराव पिचड ,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,माजी आमदार वैभवराव पिचड,पक्षाचे ज्येष्ठ नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व नगरसेवक यांनी जो विश्वास दर्शविला व मला नगराध्यक्ष पदाची संधी दिली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत या सर्वांच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही.यापुढील काळात अकोले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही वडजे यांनी दिली.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अ .ता .एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष इंजि.सुनील दातीर,सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, माजी सेक्रेटरी यशवंतराव आभाळे,राजेंद्र देशमुख, रामनिवास राठी आदींनी मार्गदर्शन केले. आभार भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button