अवैध दारू विक्री करणाऱ्या पंचायत समिती सदस्यांवर राजुर पोलिसांची कारवाई!

अकोले/प्रतिनिधी
बुधवार दि. 09/02/2022 रोजी सायंकाळी 05 वाजण्याच्या सुमारास देवगव ता अकोले येथील देवराम लहानु सामीरे (रा सोनारखाडं वस्ती,देवगाव )हा त्याचे राहते घराजवळ मेकडॉल कंपनीचे 2560/- रुपये ची विदेशी दारू ची ॲक्टिवा कंपनीची स्कूटरवर विकताना मिळून आल्याने त्यावर छापा टाकून राजूर पोलिसांनी कारवाई केली . अवैध विदेशी दारू विक्री करणारा आरोपी हा अकोले पंचायत समितीचा सदस्य आहे राजकीय पुढारीच आता अवैध दारू विक्री करत असल्याने तालुक्यातील अवैध दारू विक्री वर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे समाजसेवकच आता या व्यवसायात उत रल्याने तालुक्यातील अवैध दारू चा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे
गुन्ह्यामध्ये 2560/- रुपये किमतीची विदेशी दारू व 80,000 /- ची ॲक्टिवा स्कूटर ( नंबर MH 17 CQ 4896 ) गुन्हयामध्ये जप्त करण्यात आली आहे. असा एकूण 82,560 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाडे यांनी पोलीस स्टेशनला आरोपी देवराम लहानु सामीरे याच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने त्यावर मुंबई प्रो. अक्ट कलम 65 (इ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.—–
—–////—-