इतरपर्यटन

फोफसडी येथे पाण्यात बुडालेल्या त्या दोन पर्यटकांचे मृतदेह सापडले!

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील फोफसंडी येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी दुपारी घडली होती

रात्री उशिरा पर्यंत शोधूनही त्यांचा शोध न लागल्याने आज शनिवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू केले आपत्ती व्यवस्थापन ची टीम , राजूर पोलीस स्टेशन तसेच पोहन्यात तरबेज असणाऱ्या दोघा व्यक्तींच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या दोघा तरुणाचा मृतदेह डोहातील कपारीतून बाहेर काढण्यात आला

अभिजित वरपे व  पंकज पलांडे  असे या  मृत तरुणांचे  नाव  आहे  ते संगमनेर तालुक्यातील कनोली येथील रहिवाशी आहे  उत्तरीय तपासणीं साठी दोन्हीं मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले 

काल शुक्रवारी हे तरुण संगमनेर हुन दुचाकी वरून फोफसंडी येथे पर्यटनांसाठी गेले होते त्यांचे सोबतइतर आणखी दोन मित्र होते दुपारी दोन ते अडीच वाजनेचे सुमारास हे चार पर्यटक हे मित्र फोफसंडी गावाजळ असणाऱ्या ओढ्यावर पाणवठा धबधब्या वर थांबले होते या ठिकाणी एक जण पाण्यात उतरून अंघोळ करत असता पाय घसरला आणि पाण्यात बुडू लागला त्यावेळी दुसऱ्याने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली पण यात दोघंही बुडाले सोबत आलेले दुसरे दोघा मित्रांनी गावात जाऊन हि माहिती गावकऱ्यांना दिली

त्यांना नंतर काही गावकरी या घटनेकडे धाऊन आले बुडालेले दोघांचा शोध सुरू केला परंतु रात्र झाल्याने व पाऊस सुरू असल्याने उशिरा पर्यंत त्यांचा मृतदेह सापडला नाही

फोफसंडी हे अकोले तालुक्यातील अतिदुर्गम निसर्ग रम्य ठिकाण असल्याने या ठिकाणी राज्यभरातून अनेक पर्यटक पर्यटना साठी येत असतात सध्या अकोले तालुक्यात पाऊस पडत असल्याने निसर्गाचे सौंदर्य व आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक इकडे आकर्षित होत आहे फो फ संडी हे गाव राज्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते यामुळे या भागात कायम पर्यटकांची वर्दळ असते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button