नेप्ती च्या पै.गायत्री खामकर हिचे राज्य स्तरीयकुस्ती स्पर्धेत यश

अहमदनगर -नेप्ती गावची पै .गायत्री वर्षा शिवाजी खामकर हिने राज्यस्तरीय झालेल्या कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांका सह सिल्व्हर मेडल मिळविले
गायत्री हिने नेप्ती गावाचे आणि नगर जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या नकाशा वर कोरल आहे अतिशय सामान्य कुटुंबातील पै.गायत्री खुप मेहनतीने आणि कष्ट,जीद्दिने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक सह सिल्व्हर मेडल जिंकून आपल्या आई वडील याच्यां कष्टाचे चीज केले .
तिच्या या कामगिरीचे महाराष्ट्र भर कौतुक होत आहे.आज नेप्ती गावातील सामजिक कार्यकर्ते अमोल चौगुले, ग्रा. प. स.बंडू जपकर ,अनिल पंडित,अनिल पवार,अंबादास जपकर,अतुल गवारे,सिद्धांत जपकर, भारत गव्हाणे,अभिजित जपकर, जमिर सय्यद,बाळासाहेब होळकर,संदीप कदम,अमोल होळकर आणि सर्व ग्रामस्थांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.