ज्युदो स्पर्धेत सर्वोदय विदयालयाची धडाकेबाज कामगिरी.जयेश बोऱ्हाडे ब्राँझ पदकाचा मानकरी.

अकोले/प्रतिनिधी –
अहमदनगर जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धा सावित्रीबाई फुले विद्यालय राहुरी येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यानी यश मिळविले.यामध्ये ४५ किलो गटात जयश बोऱ्हाडे याने प्रथम क्रमांक पटकाविला असून या खेळाडूची विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली होती.
तसेच डगळे ओमकार ५० किलो द्वितीय, चौधरी यश ४० किलो द्वितीय, चौधरी सार्थक ४५ किलो द्वितीय, साळवे साक्षी ४५ किलो द्वितीय, उघडे शारदा ५७ किलो द्वितीय, कोंडार पुजा ४८ किलो द्वितीय क्रमांक मिळवत या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती शैक्षणिक व क्रीडा संकुल,त्रिमूर्तीनगर (ता.नेवासा) जि.अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय शालेय ज्युदो स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धांत सर्वोदय विदयालयाने धडाकेबाज कामगिरी करत विभागीय स्तरावर यश संपादन केले आहे.यामध्ये जयेश गणेश बोऱ्हाडे हा खेळाडू ब्राँझ पदकाचा मानकरी ठरला आहे.त्यामुळे जयेशने विदयालयासह आई वडीलांचे नाव रोशन केले आहे.या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक जालिंदर आरोटे,विनोद तारू यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच खेळाडूंचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख,सचिव टी. एन.कानवडे,कोषाध्यक्ष
विवेकजी मदन,संचालक मिलिंदशेठ उमराणी,प्रकाश टाकळकर,विजय पवार,अशोक मिस्त्री,एस.टी.येलमामे, श्रीराम पन्हाळे,विलास पाबळकर व सर्व संचालक मंडळ यांसह विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर,उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी,माजी प्राचार्य लहानु पर्बत,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विस्तारअधिकारी सविता कचरे,गटशिक्षणाधीकारी जालिंदर खताळ, केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव,क्रीडाप्रेमी आदिंनी अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
