लेखापरीक्षण पूर्तता साठी खोटे दस्तऐवज देणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
लेखापरीक्षण पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायत चे खोटे दस्तऐवज देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या ग्रामसेवक सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे
ग्रामपंचायत कार्यालय कांगोणी येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण नांगरे आणि तत्कालीन लोकनियुक्त सरपंच अप्पासाहेब शिंदे यांनी सन २०१५-१६ आणि सन २०१६-१७ या दोन आर्थिक वर्षाच्या ग्रामपंचायत लेखा परीक्षण अहवालात घेतलेल्या आक्षेपांबाबत पूर्तता केल्याबाबत दोन लेखा परीक्षण पूर्तता अहवाल पंचायत समिति कार्यालय, नेवासा येथे सादर केले होते. सदरचे दोन लेखा परीक्षण पूर्तता अहवाल सादर करण्यापूर्वि त्याबाबत दि २२/११/२०१९ रोजीच्या ग्रामसभेत मंजूरी घेतली असल्याचा खोट्या माहितीचा बनावट ग्रामसभेचा ठराव देखील त्यामध्ये सादर त्यांनी केला होता परंतु लेखा परीक्षण पूर्तता अहवालातील आक्षेपांची कोणतीही पूर्तता न करता तसेच त्याबाबत ग्रामसभेत कोणताही ठराव प्रत्यक्षात मांडलेला नसताना खोट्या माहितीचा ग्रामसभेचा ठराव आणि अपूर्ण माहितीचे लेखा परीक्षण पूर्तता अहवाल सादर करून भ्रष्टाचार, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांचेवर गुन्हा दाखल होऊन प्रशासकीय कारवाई होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे आणि काही कांगोणी ग्रामस्थांनी पंचायत समिति नेवासा आणि जिल्हा परिषद अहमदनगर येथे वेळोवेळी तक्रारी, आंदोलने केली होती.

या तक्रारी, आंदोलंनांची दखल घेत पंचायत समिति, नेवासा येथील गटविकास अधिकारी यांनी सदरच्या लेखा परीक्षण पूर्तता अहवालानुसार शक पूर्तता केल्याबाबत असणारी पूरक दस्ताऐवज, फेर सादर करण्याचे आदेश ग्रा.पं. कांगोणी येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण नांगरे, आणि ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे यांना दिले होते.

लेखा परीक्षण अहवालानुसार शक पुर्तता केली नसल्याचे आढळून आल्याचा खुलासा ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे यांनी सादर केला आहे परंतु ग्रा.पं. कांगोणी येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण नांगरे यांनी पंचायत समिति नेवासा येथे अजून कोणताही खुलासा सादर केलेला नसल्यामुळे त्यांना पंचायत समिति नेवासा येथील गट विकास अधिकारी सुरेश पाटेकर साहेब यांनी अंतिम कारणे दाखवा नोटिस पाठविली आहे. लेखा परीक्षण अहवालातील आक्षेपांची पूर्तता न करता त्याबाबत खोट्या माहितीचा ग्रामसभेचा ठराव देऊन शासनाची फसवणूक, भ्रष्टाचार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कांगोणी ग्रामस्थांनी केलेली आहे.