महाराष्ट्र

जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीड़ा व सांस्कृतिक स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा पुण्यात सन्मान!

इंजी. संतोष अडाकुल / संजय उकिरडे

पुणे – दि 15

जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय पंचम क्रीड़ा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ लोणी-प्रवरानगर जिल्हा अहिल्या नगर येथे येथे पार पडल्या या स्पर्धेतील यशस्वी
खेळाडूंचा सन्मान तथा सत्कार सोहळा पुणे येथे पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी संचालक धुमाळ साहेब, तसेच सांगळे साहेब, फाळके साहेब, पाटील साहेब, काटकर साहेब यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी उत्साह, अभिमान आणि आनंदाने भारलेले वातावरणाने या सोहळ्याला वेगळीच उंची मिळाली

या स्पर्धांमध्ये जलतरण, कॅरम, समूह गायन, हॉलीबॉल पासिंग, शूटिंग (५ वेळा विजेता), कबड्डी स्पर्धा (५ वर्षे विजेता), कबड्डी महिला, पुरुष डान्स उपविजेता, एकांकिका उपविजेता, सामूहिक नाटक उपविजेता, क्रिकेट पुरुष विजेतेपद, क्रिकेट महिला उपविजेतेपद, फोटोग्राफी विजेतेपद, बॅडमिंटन पुरुष, बॅडमिंटन दुहेरी उपविजेतेपद, अ‍ॅथलेटिक्स पुरुष, भालाफेक, लांब उडी, १०० मीटर धावणे, १०० मीटर रिले, टेबल टेनिस अशा विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये खेळाडूंनी उज्ज्वल कामगिरी केली.वरील सर्व स्पर्धेतील विजेते व उपविजेते व सहभागी खेळाडूंचा अत्यंत आल्हाददायक आणि जल्लोषमय वातावरणात सन्मान सोहळा पार पडला.सर्व खेळाडूंच्या सत्कारानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

उपस्थित खेळाडू यांचे मनोगत,

*शाम निकम (कॅरम चॅम्पियन,)
पहिल्यांदाच असा सत्कार सोहळा पार पाडत असल्याचे सांगत, या सन्माना मुळे सर्व खेळाडूंना नक्कीच नवी प्रेरणा मिळेल असे त्यांनी सांगितले. सांघिक कार्यक्रमात सर्वांनी अतिशय सुरेख कामगिरी केली असली तरी पुढे वैयक्तिक कामगिरीवर ही भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
फक्त २ दिवसांत एकांकिका लिखाण करून, कलाकारांकडून झटपट तयारी करून ती सादर करत विजेतेपद पटकावल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

MKVDC क्रिकेट टीमचे कर्णधार हणमंत गाडे यांनी अंतिम सामन्याचा थरार सांगताना वातावरणात उत्सुकतेची लाटच निर्माण केली. *कोकणाकडे एक जबरदस्त खेळाडू मुंडे होता, परंतु आपल्याकडे मात्र १० मुंडे होते, असे मिश्कील भाष्य करत त्यांनी सर्वांना अचंबित करून टाकले.
संघाच्या जिद्दीच्या जोरावर अशक्यप्राय वाटणारा सामना कोकणच्या जबड्यातून खेचून आणला, असे त्यांनी सांगितले.

🟡 एक पात्री कलाकार सोलापूरचे उपविजेता आपणा कोळी यांनी बाप या विषयावर कथन करताना बाप हा संसाराचा भार वाहूनही वेदनांचा धनी असल्याचे सांगितले.

🟢 सोलापूरचे इंजी. संतोष अडाकुल (से . नि. ) यांनी आपले मत व्यक्त करताना, सुरुवातीलाच त्यानी १९९८ साली १५ दिवस
जेल मधे असल्याचे सांगितले, सर्व उपस्थित थक्क !
जेलमधील कैदीचा चेहरा आणि तुमचा चेहरा सारखाच दिसतोय ( एकच हशा 😂)

सर्व खेळाडू अगदी गंभीर बसलेले असल्याने सुरुवात अशी करावी लागली.

जीवन खूप सोपे आहे त्याचा आहे तसा स्वाद बिनधास्तपणे घेणे म्हणजेच जीवन.
एक उदाहरण देताना अडाकुल यांनी एक उंदीर असतो, तो सिंहाला म्हणतो, तू माझ्याशी लग्न करतोस, सिंह म्हणाला अरे तू कोण आणि मी कोण? मी जंगलाचा राजा आणि तू उंदीर,असे पंजेत घेऊन दाबला की मरून जातोस, तुझी औकात काय माझ्याशी लग्न करायची?
उंदीर प्रत्युत्तर देतो, औकात सोड माझी डेअरिंग बघ तुझ्याशी लग्न करायला निघालो. 😂

तात्पर्य एकच डेअरिंग तथा धैर्य, धाडस?
धैर्यवान व्यक्ती कधीच रणांगण सोडून पळून जात नाही, तसे जो कोणी धैर्याने लढतो तोच धुरंदर, आपले mkvdc चे धुरंधर खेळाडू धैर्याने खेळले म्हणून चॅम्पियन्स बनले, तसे आयुष्यात नेहमी धाडस कायम ठेवत आनंदी जीवन जगावे असे आपले मत व्यक्त केले.

🔶 कार्यकारी अभियंता देवकर मॅडम यांनी जिद्द, चिकाटी आणि आपले सर्वस्व पणाला लावून यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले. अशा प्रकारचा सन्मान प्रथमच आयोजित केल्याबद्दल धुमाळ साहेबांचे आभार मानले.
त्यांनी सांगितले की जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक खेळ यांच्या बळावर यश मिळते. याच जिद्दीने आपण आपल्या कार्यक्षेत्रातही उत्साहाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

क्रिकेट हा लोकप्रिय खेळ असला तरी हॉलीबॉल व कबड्डी या खेळांतही प्रचंड चित्तथरारक क्षण अनुभवायला मिळतात, ते पाहण्यासाठी पुढील वर्षी सांगली ला नक्की या असे त्यांनी सांगितले

पूजा मचले यांनी केवळ १.५ महिन्यांचे बाळ घेऊन कबड्डी स्पर्धेत भाग घेतला, ही बाब विशेष कौतुकास्पद असल्याचे सांगत तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

विरोधी संघातील कुमार याच्या खेळाचे राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू गणेश काळे यांनी तोंडभरून कौतुक केले.प्रति स्पर्ध्याच्या खेळाचे कौतुक करणारे ते मोठ्या मनाचे खेळाडू असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
महामंडळ स्तरीय सामने एकाच शहरात खेळवावेत असे शेवटी सुचविण्यात आले. कारण एकाच खेळाडूला विविध खेळांसाठी वेगवेगळ्या शहरात जावे लागल्याने दमछाक होत असल्याचे सांगण्यात आले.
🟠⚪️🟢

🔷 कार्यकारी अभियंता जाधव साहेबांनी सांघिक व वैयक्तिक खेळांना समान गुण देण्याच्या पद्धतीत बदल व्हावा, असे मत मांडले. धुमाळ साहेब सचिव झाल्यास याबाबत नक्की विचार व्हावा अशी विनंती त्यांनी केली.
🟠⚪️🟢

🔶 सातारा सिंचन मंडळ साताराचे अधीक्षक अभियंता अभय काटकर साहेब यांनी, महामंडळ अंतर्गत स्पर्धांचे आयोजन करण्याची जबाबदारी तथा संधी दिल्याबद्दल त्यांनी धुमाळ साहेबांचे विशेष आभार मानले.

संघ निवडीसाठी कॅम्प आयोजित करण्यासाठी वेळेची मर्यादा असल्यामुळे प्रथमच कॅम्प आयोजित करता आला नाही. त्यामुळे खेळाडूंच्या सामन्यातील कामगिरीचा व अनुभवाचा विचार करून संघ निवडण्यात आला.

सातारा सिंचन मंडळ यापूर्वी फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करत असे; परंतु धुमाळ साहेबांनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी दिली.

शेवटी संतोष अडाकुल गुरुजी यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले. कधी कॉमेंट्री, कधी cheer-up, कधी सामन्याचे THIRD 👁️ EYE विश्लेषण, तर कधी खेळाडूंना चिक्की वाटप करून, प्रोत्साहन देत त्यांनी बहुआयामी भूमिका पार पाडली. त्यांच्या या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाला संघाचा ब्रँड ॲम्बेसेडर असे गौरवोद्गार देण्यात आले.
🟠⚪️🟢

समन्वयक कुमार पाटील साहेबानी कबड्डी खेळातील आपल्या खेळाडूंनी दाखविलेल्या अभूतपूर्व कामगिरीचे कौतुक केले.

त्यांनी विनोदी शैलीत आपले मत व्यक्त करताना, धुमाळ साहेबांनी मुंडेला सांगितले – “तू खूप चांगला खेळतोस, तुझी बदली MKVDC ला करतो!” (एकच हशा😂 )

१४५ धावांचे आव्हान पाहून धुमाळ साहेबांना थोडी धाकधूक वाटत होती; परंतु त्यांच्या प्रेरणेने पेटून उठलेल्या कर्णधार गाडे, हर्षद कारंडे आणि मुस्ताक मुल्ला यांनी सामना जिंकून दाखवला.
पुढील स्पर्धा गोव्या जवळ सिंधुदुर्ग येथे असल्याची आठवण करून देत “गोव्याऐवजी सिंधुदुर्गला गाडी वळवा” असे म्हणत हास्याची 😂 फुलबाजी उडवली.

गुणांकन पद्धतीत सुधारणा झाल्यास MKVDC टीम पहिला नंबर मारेल, असेही मत त्यांनी मांडले.

अध्यक्षीय भाषणात धुमाळ साहेबांनी, सांगलीकर थोडे घाबरट असले तरी अतिशय प्रेम करतात. असे सांगत उपस्थितांमध्ये हास्याची😂 लहर निर्माण केली.

खेळाडूंनी सर्व खेळांत अभूतपूर्व कामगिरी केल्यामुळे त्यांचा सन्मान व्हावा अशी मनापासून इच्छा होती; परंतु कामाच्या व्यापामुळे हा कार्यक्रम आठवडाभर पुढे ढकलावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्हा व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/GevxUmVFhtHEZn653MWOmu?mode=hq1tcla

सोलापूर जिल्हा ग्रुप 👇

://chat.whatsapp.com/JU9XYZeDBlULp3PXtBO6Ks?mode=gi_t

“ट्रॉफी मिळवणाऱ्यांचे अभिनंदन…
ट्रॉफी न मिळवणाऱ्यांचेही अभिनंदन
सहभाग घेणाऱ्यांचेही अभिनंदन…
आणि सहभाग न घेता इथे आले त्यांचेही अभिनंदन!”
(एकच हशा 😂)

“वारंवार खेळत चला… वारंवार जिंकत चला…
आणि जिंकल्यावर मला उचलून घ्या!”
(एकच हशा, 😂)
गाड़ेच्या कॉन्फिडेंस व खेळाची विशेष कौतुक केले.
संतोष अडाकुल आपल्या मनोगतात वातावरण प्रफुल्लित केल्याचे विशेष नमूद करत, खेळाडूना प्रेरणा तथा cheer up करण्याचे आपली भूमिका अशीच चालू ठेवण्याचे सूचित केले.

काहींनी धाडस करून छान बोलले, काहींनी टोमणे मारले… ,😂 पण वातावरण मात्र आनंदाने फुललेले होते.

“चक दे इंडिया” चे उदाहरण देत खेळ हा आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत पुढील स्पर्धेत पूर्ण तयारीने उतरण्याचे आवाहन त्यांनी केले.
शेवटी धुमाळ साहेबांच्या चक दे इंडिया या जयघोषाने वातावरण दुमदुमत होते.

या कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन अनिकेत जवळेकर यांनी आपल्या प्रभावी आणि भारदस्त आवाजात केले.

सांगलीचे नीलम नाकाडे DK यांनी हा सन्मान सोहळा आयोजित केल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सचिन गाडे (उपअभियंता) यांनी केले. शेवटी स्नेह भोजनाने या संस्मरणीय कार्यक्रमाची आनंददायी सांगता झाली.

🟠⚪️🟢

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button