इतर
भेंडा येथील साखळी उपोषण स्थगित

नेवासा प्रतिनिधी।
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू उपोषण केलेले आमरण शासनाच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेनंतर स्थगित केल्याने त्यांच्या समर्थनार्थ भेंडा येथे बुधवार १ डिसेंबर पासून सकल मराठा समाज्याच्या वतीने साखळी उपोषण सुरु असलेले उपोषणही स्थगित करण्यात आले.
सकल मराठा समाज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले साखळी आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे,ग्रामस्थांच्या उपस्थित स्थगित करण्यात आले.यावेळी उपोषणस्थळी ३०० हून अधिक सामाजिक,राजकिय कार्यकर्तेनी भेट देऊन पाठिंबा दिला.सर्व जाती,धर्माच्या ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले.