43 वर्षा पुर्वीच्या बालमित्रांची शाळेला 50 हजारची गुरुदक्षिणा !

कोतुळ प्रतिनिधी
43 वर्षानंतर शाळेत एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेला पन्नास हजार रुपयांची गुरुदक्षिणा दिली
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील रयत शिक्षण संस्थेचे कोतुळेश्वर विद्यालय कोतुळ या विद्यालयात तब्बल ४३ वर्षांनी विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्रित आले आणि आपल्या शिक्षकांचे गुरुपूजन केले त्यावेळी शिक्षण देणाऱ्या गुरुजनांचा या माजी विद्यार्थानी सत्कार केला . निमित्त होते माजी विदयार्थी स्नेह मेळाव्याचे
या विद्यालयाच्या १९८० च्या बॅच विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर स्नेहसंमेलन संमेलनास जि प सदस्य रमेश काका देशमुख उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी शाळा समिती चे अध्यक्ष कृषिमित्र श्री सयाजीराव गोपाळराव देशमुख होते.

सामाजिक कार्यकर्ते शिवाजी तुकाराम देशमुख, शाहीर श्री तुळशीराम जाधव, श्री ज्ञानदेव घोलप ,श्री संजय देशमुख, श्री प्रदीप बोऱ्हाडे श्री बाळासाहेब कोरडे, श्री रमेश आहेर, श्री निवृत्ती आरोटे, व श्री राजेंद्र परशुरामी यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते
सदर कार्यक्रमास तत्कालीन सात गुरुवर्य शिक्षक तब्बल ४३ वर्षानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींना भेटले होते त्यांनीही या कार्यक्रमाचे फार कौतुक केले व आता साठी पर्यत पोहचलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कोतुळेश्वर विद्यालय कोतुळ मुख्याध्यापक श्री इरणक सर यांनी ही मार्गदर्शन केले
तब्बल ४३ वर्षानंतर विद्यार्थी विद्यार्थिनी सदगदित व हर्ष उल्हासितपणे एकमेकांना भेटले सदर स्नेह संमेलन सोहळा मोठ्या आनंदाचा व अतिशय हर्ष उल्हासात पार पडला एकमेकांसोबत चहा नाश्ता स्नेह भोजन घेत जुने सवंगडी काही काळ बालपणीच्या गप्पा मध्ये रंगले
सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थितीत माजी विदयार्थीनी शाळेला गुरुदक्षिणा म्हणून पन्नास हजाराची रुपयाची देणगी ची भेट दिली

—-////—–