सखाराम गांगड यांना आदिवासी सेवक पुरस्कार जाहिर..!

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील सांस्कृतिक परंपरेचा वारसा पुढे नेणारे कांबड- नृत्य कलावंत म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असणारे अकोले तालुक्यातील सांस्कृतिक कलांचे भुषण व कळसूबाई परीसर आदिवासी नृत्य चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते म्हणून ख्याती असणारे
उडदावणे (ता.अकोले जि-अहमदनगर ) येथील सखाराम ठकाजी गांगड, यांना 2019-2020 चा महाराष्ट्र शासनाचा “आदिवासी सेवक पुरस्कार” जाहीर झाला आहे.
अकोले तालुक्यातील आदिवासी सांस्कृतिक चळवळीसाठी आपले अवघे जीवन व्यथित करणारे विविध पशुपक्ष्यांचे,प्राण्यांचें आवज काढणारे
पक्षीमित्र,निसर्गमित्र ठकाबाबा गांगड यांनी आयुष्यभर आदिवासी कला जोपासली व पुढे नेली खडतर असे आयुष्य जगुन महाराष्ट्रातील आदिवासी कांबड-नृत्य कला राजधानी दिल्लीत पंतप्रधानांसमोर सादर केली.महाराष्ट्रातील विविध शहरात सादरीकरण करुन अकोल्यातील आदिवासी कलेला एक सांस्कृतिक अधिष्ठान निर्माण करुन दिले असे ठका बाबा गांगड यांचा संमृद्ध वारसा पुढे चालवणारे त्यांचे सुपुत्र श्री. सखाराम ठका गांगड यांना राज्य शासनाने पुरस्कार देऊन आमच्या अकोल्याच्या सांस्कृतिक कलांचा खरा सन्मान केला असल्याचे मत श्री.गांगड यांनी व्यक्त केले.
श्री.सखाराम गांगड यांना आदिवासी सेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल घाटघरचे सरपंच लक्ष्मण पोकळे, लक्ष्मण गांगड,खडके,शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे,प्राचार्य दिलीप रोंगटे शेंडी, मुख्याध्यापक श्री.आदिनाथ सुतार मुतखेल,पत्रकार संजय महानोर , विलास तुपे व इतर मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.