तंत्रज्ञानामुळे वाढत जाणारी विषमता चिंताजनक.- डॉ . अनिल काकोडकर

मुंबई – तंत्रज्ञानामुळे समाजात वाढत जाणारी विषमता ही चिंताजनक बाब आहे. गांधींजीनी नवतंत्र्यांना विरोध केला नाही तर तंत्रज्ञानामुळे समाजात वाढ झालेल्या विषमता आणि होणारे श़ोषण ही त्यांच्या दृष्टीने चिंताजनक बाब होती असे प्रतिपादन पद्मविभूषण व ज्येष्ठ अनुभौतिक शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी केले. ते मराठा मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित साहित्य पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ अर्थतज्ज्ञ व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नरेंद्र जाधव उपस्थित होते.व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख ,प्रदीप विचारे ,दिलीप चव्हाण उपस्थित होते.
डॉ.अनिल काकोडकर म्हणाले की तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्था सक्षम होण्यास मदत होत असते. मात्र तंत्रज्ञानामुळे वाढत जाणारी विषमता याचा अधिक विचार करण्याची गरज आहे .समाजातील सर्व स्तराचे सक्षमीकरण होईल असे नव तंत्रज्ञान उपयोगात आणण्याची गरज आहे .शिक्षणामुळे समाजात समता प्रस्थापित होत असते आणि तेच एकमेव प्रभावी माध्यम आहेत.तंत्रज्ञानामुळे समाजातील विषमता वाढत जाते आहे आणि गांधींजीनी त्या वाढत जाणाऱ्या शोषणाविरुद्ध भूमिका घेतली होती .त्यांनी तंत्रज्ञानाला विरोध केला हे म्हणणे चुकीचे आहे असे मत काकोडकर यांनी व्यक्त केले.
डॉ. जाधव आपल्या भाषेत म्हणाले की मला काही सांगावे वाटते आहेत म्हणून मी लिहित जातो. मी जे काही लिहीत गेलो त्यातून मी स्वतः अभिव्यक्त होत गेलो आहे.मला लिहिण्याची सतत प्रेरणा मिळत गेली .जेव्हा लिहिणारी माणसं लिहीत जातात पण वाचणारी माणसे मिळत नाहीत तेव्हा आपल्याला बोलावे लागते .आपण लवकरच आपली आत्मकथा लिहिणार असून त्यासाठी “माझी माती माझी आकाश ” हे पुस्तक लवकरच वाचकांचे भेटीला येणार आहेत.किमान 51 ग्रंथ लिहिण्याचा आपण संकल्प सोडला आहे. भारतातून एकेकाळी पाच अब्ज डॉलर हवालाद्वारे बाहेर जात होते. आपल्याला समाजात परिवर्तन करायची असेल तर लोकांच्या पाठिंब्याशिवाय परिवर्तन साध्य करणे अवघड आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले .
यावेळी महाराष्ट्रातील कथा ,कविता, वैचारिक साहित्य, बाल साहित्य, आत्मकथा ,ललित अशा विविध प्रकारच्या वांड:मय साहित्य कृतींना गौरविण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील संदीप वाकचौरे यांच्या सुर्जनाची वाट या पुस्तकाला पुरस्कार देण्यात आला.डॉ. काकोडकर व डॉ.नरेंद्र जाधव यांच्या शुभहस्ते स्मृती चिन्ह,रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन हा सन्मान करण्यात आला. राहता पंचायत समिती माझी गट शिक्षणाधिकारी पोपट काळे यांच्या काजवा आत्मकथनालाही गौरवण्यात आले. महाराष्ट्रभरातून आलेल्या अनेक साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महाराष्ट्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.