कोतुळ ग्रामपंचायत ती ग्रामसभा रद्द करण्याचा ग्रामसभेत निर्णय

कोतुळ प्रतिनिधी
विकास कामांचा निकृस्ट दर्जा आणि संशयास्पद रीतीने राबविलेली टेंडर प्रक्रिया यावरून मागील वर्षी झालेला विकास कामांवरील खर्च कोतुळ च्या ग्रामसभेत मंगळवारी नामंजूर करण्यात आला यापूर्वी झालेली खोटी ग्रामसभा रद्द करावी व ही खोटी ग्रामसभा दाखवून दिशाभूल करणारे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा असा ठराव या ग्रामसभेत मांडण्यात आला
कोतुळ ग्रामपंचायतची ग्रामसभा आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर पार पडली ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी सरपंच सयाजीराव देशमुख हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी व्यासपीठावर सरपंच भास्कर लोहकरे उपसरपंच संजय देशमुख ग्रामविकास अधिकारी बाविस्कर यांच्यासह ग्रामपंचायत व पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी ग्रामपंचायतने मागील वर्षात केलेल्या विकास कामांच्या खर्चावर राजू पाटील देशमुख शंकर घोलप यांनी आक्षेप नोंदवत आजच्या ग्रामसभेत विकास कामावरील खर्च नामंजूर करावा असा ठराव मांडला जलजीवन मिशन योजनेचे कामाचे टेंडर आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मिळावे यासाठी अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी हस्तक्षेप केल्याने हे काम रेंगाळल्याचा आरोप यावेळी बी जे देशमुख यांनी केला यावेळी त्यांनी आमदार लहामटे यांचे कामकाजावर गंभीर आरोप केले
जलजीवन योजनेचे काम जालिंदर डावखर या ठेकेदाराकडे असून या ठेकेदाराने विकास महाले या सब ठेकेदाराला हे काम दिले आहे या ठेकेदाराकडे 25 लाखाची टक्केवारी कोणी मागितली याबाबत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली
दि 2/9/2022 रोजी कागदोपत्री दाखविलेल्या खोट्या ग्रामसभेचा अहवाल व त्यातून निवडलेले कोतुळेश्वर देवस्थान ट्रस्ट निवडीचा ठराव रद्द करावा व सरपंच व ग्रामसेवक यांचेवर गुन्हा दाखल करावा असा ठराव सीताराम पाटील देशमुख यांनी मांडला या अविवेकी वागण्याने सरपंच यांनी राजीनामा द्यावा अशी जाहीर मागणी त्यांनी केली असता गणेश खरात यांनी यास विरोध नोंदवित ही लोकशाही नसून ही हुकमाही
असल्याचा आरोप केला
गावात चुकीचे कामे होऊ देणार नाही खोटी ग्रामसभा व असे चुकीचे ठराव करणे इतिहासात कधी झाले नाही चुकीच्या कामाला विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र असल्याचे बी जे देशमुख यांनी यावेळी सांगितले
गावात दारू बंदी करण्याचा ठराव मांडण्यात आला यावर माजी सदस्य बाळासाहेब घाटकर यांनी विरोध नोंदविला तर शासनाचा महसूल बुडेल आणि गल्लो गल्ली अवैध दारू विक्री सुरू होईल असे मत मांडून त्यांनी याला विरोध नोंदविला
अभिजित देशमुख यांनी नाचणठाव पाझर तलावाची दुरुस्ती करण्यात यावी व पथदिव्यांची कामाबाबत तक्रार नोंदवली
रमेश काका देशमुख यांनी विकास कामासाठी दर्जा बाबत तक्रार केली
गावातील ग्रामपंचायत च्या मालकीच्या जागांवर अतिक्रमण झाले आहे , ग्रामपंचायत च्या सर्व जागांची मोजनी करण्याचा ठराव मजूर करण्यात आला
रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग, गाय गोठा,आशा योजने चा आराखडा तयार केला असून सर्व खातेदार यात समाविष्ट केले आहे असल्याचे रोजगार सेवक सुरेश देशमुख यांनी सांगितले