धार्मिक

दत्त जयंती निमित्ताने नेप्तीत अखंड हरिनाम सप्ताह.

अहमदनगर:- नगर तालुक्यातील नेप्ती येथील चौरे मळ्यातील दत्त मंदिर येथे दत्त जयंती निमित्त गुरुवर्य प.पू.वै.धुंडा महाराज यांच्या आशीर्वादाने चौरे परिवार ,दत्त सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह तसेच गुरुचरित्र व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे बुधवार दि. २०डिसेंबर ते दि. २७डिसेंबर दरम्यान आयोजन केले आहे .

या निमित्ताने दत्त मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. ह .भ .प .देवराव महाराज फुले यांच्या हस्ते २० डिसेंबरला सकाळी ९ वा.कलश स्थापना होऊन सप्ताहाची सुरुवात होणार आहे. हे सप्ताहाचे ४० वे वर्षे आहे.

सप्ताहात दररोज पहाटे ४ वा. काकडा भजन. सकाळी ८वा.विष्णूसहस्रनाम व प्रार्थना सकाळी १० वा. गाथा भजन, रात्री ९वा.महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या सप्ताहात आपली सेवा देणार आहेत. बुधवार दि.२० रोजी ह. भ.प.माधव बाबा महाराज इंगोले आळंदी देवीचे, दि. २१रोजी ह.भ.प.तुळशीराम महाराज लबडे भातोडी ता. नगर, दि. २२रोजी ह. भ. प. राऊत दादा महाराज पिंपळा ता. आष्टी , दि. २३रोजी देविदास महाराज अडभाई चांदा तालुका नगर ,दि. २४ रोजी ह. भ. प. हरिदास महाराज पालवे श्रीश्रेत्र वृद्धेश्व़र ता.पाथर्डी ,दि.२५ रोजी ह.भ.प.हरिभाऊ महाराज भोंदे पिंपळगाव माळवी ता. नगर, दि. २६ रोजी ह.भ.प. मुकुंदकाका महाराज जाटदेवळे यांचे दत्तजन्माचे किर्तन ४वा.होईल.त्यानंतर ६ वा. पालखी सोहळा होईल. तसेच ह. भ. प. सचिन महाराज पुंड शिंगवे तुकाई ता. नेवासा यांचे रात्री ९ वा. कीर्तन होणार आहे.

बुधवार दि. २७ डिसेंबर रोजी ह. भ. प. बाळकृष्ण महाराज कांबळे ताहराबाद ता. राहुरी यांचे काल्याचे किर्तन सकाळी ९ ते ११ या वेळात होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे .तरी परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चौरे परिवार व दत्त सेवा मंडळाने केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button