विशेष पोलीस महानिरिक्षकांकडून राजुर पोलीस स्टेशनचा सन्मान.

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांचे कामगिरीचे बी. जी. शेखर पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचेकडून विशेष गौरव करण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला हेही उपस्थित होते
विविध गुन्ह्यांच्या तपासात जप्त करण्यात येणारा मुद्देमालाची मुळ मालकांच्या ताब्यात देवून, तपासणी करीता पाठवून व सुनावणी करीता कोर्टात सादर करून व इतर मार्गांनी करण्यात येत असते. राजूर पोलीस स्टेशनने सन 2023 या वर्षात जिल्ह्यात सर्वात जास्त ( 48 % ) मुद्देमालाची निर्गती करत अव्वल कामगिरी केली असून सदर कामगिरीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. बी. जी. शेखर पाटील यांनी प्रशंसापत्र देवून गौरव केला आहे.
सदरची कामगिरी मा. राकेश ओला, पोलीस अधिक्षक अ.नगर, मा. श्रीमती स्वाती भोर ,अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व मा. सोमनाथ वाघचौरे , उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए जे शेख, मुद्देमाल विभागाच्या पो. कॉ. सुवर्ण शिंदे, पो कॉ. कैलास नेहे, पो. कॉ रोहिणी वाडेकर, पो. कॉ विजय मुंढे, पो. कॉ.मनोहर मोरे पो. ना. स्वाती नायकवाडी, सह राजूर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली आहे.