इतर

अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या अध्यक्षपदी अमित भांगरे यांची निवड

अकोले प्रतिनिधी

 शरद पवार गटाच्या अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक   अमित अशोकराव भांगरे यांची आज निवड करण्यात आली 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आदेशाने आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पवार साहेबांनी माझ्यावर नेहमीच जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा कायमच ऋणी राहील. या पदाच्या निमित्ताने निश्चितच जबाबदारी देखील वाढली असून जिल्ह्यात तरुणांच्या हितासाठी तसेच शिक्षण, बेरोजगारी या प्रश्नांवर मी प्रामुख्याने काम करु . माझे वडील लोकनेते स्व. अशोकराव भांगरे साहेब हे या क्षणी हवे होते परंतु दुर्दैवाने भांगरे साहेब आज आपल्यात नाहीत. त्यांची उणीव नेहमीच भासते. त्यांच्या पश्चात भांगरे घराण्याचा राजकीय वारसा मी माझ्या पूर्ण क्षमतेने पुढे नेईल.

तसेच पक्षाचे ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व जनतेला न्याय देण्यासाठी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र मेहनत घेईल. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील  व राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या साथीने भविष्यात माझ्या कार्यपद्धतीचा वेग हा वाढलेला असेल  असे अमितदादा भांगरे यांनी म्हटले आहे

मुंबईत या नावाची आज घोषणा करण्यात आली यावेळी
सुरेश गडाख, विनोद हांडे, बाळासाहेब भांगरे,विकास बंगाळ सुहास वाळुंज, अनिकेत तिटमे उपस्थित होते. त्यांच्या निवडीचे अकोले तालुक्यात स्वागत करण्यात येत आहे

——–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button