कर्ज-विषयक धोरण समितीची बैठक संपन्न

अहमदनगर-अहमदनगर जिल्ह्याचे 2024-25 सालाकरीता विविध पिकांचे कर्ज-विषयक धोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली
कर्ज विषयक धोरण ठरवून राज्यस्तरावर शिफारस करण्याबाबदची ही बैठक अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालिमठ यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगर येथे पार पडली.
यावेळी महात्मा फुले क्रुषि विद्यापीठ राहुरी चे शास्त्रज्ञ,जिल्हा अधीक्षक क्रुषि अधिकारी,लीड बँकाचे अधिकारी,अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे ,जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,अहमदनगर यांचेसह अनेक मान्यवर,जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते.
समिती सदष्य शेतीतज्ञ सयाजीराव पोखरकर यांनी या सभेत सहभागी होवून अकोले तालुक्यातील सीमांत शेतकऱ्यांसाठी काही ठोस भूमिका मांडली .