महात्मा फुलें च्या शिक्षणाच्या चळवळी मुळे समाज शिक्षित झाला -रामदास फुले

अहिल्यानगर /प्रतिनिधी
-थोर समाज सुधारक महात्मा फुले यांनी सर्व समाजाला शिक्षणाची द्वारे खुली केले.महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली. त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचा वारसा पुढे चालवण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांनी सुरू केलेल्या शिक्षणाच्या चळवळीमुळेच आज सर्व समाज शिक्षित झाला आहे.तसेच चूल आणि मूल या संकल्पनेतून महिलांना बाहेर पडता आले.त्यामुळेच आज देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती, खासदार,आमदार, सरपंच या सर्वोच्च पदापर्यंत महिला पोहोचल्या आहेत.महात्मा फुले यांच्यामुळे आज सर्व समाज शिक्षित झाला आहे.असे प्रतिपादन सकल माळी समाजाचे नेप्ती विभागाचे अध्यक्ष रामदास फुले यांनी केले आहे.
माळीवाडा येथे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सकल माळी समाजाच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले,उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, प्रा.माणिक विधाते,पंडितराव खरपुडे, नेप्ती विभाग अध्यक्ष रामदास फुले, विष्णुपंत म्हस्के,डॉ.रणजीत सत्रे, ब्रिजेश ताठे,राजेंद्र पडोळे, चंद्रकांत पुंड, विनोद पुंड ,मच्छिंद्र बनकर, राजेंद्र ताठे, कॅप्टन सुधीर पुंड, रोहित पठारे, ज्ञानेश्वर रासकर,अनिल इवळे,रमेश चिपाडे, ज्ञानदेव खराडे, संजय ताजणे, डॉ.दामोधर कळमकर, एडवोकेट गाडेकर,अँड.अशोक गायकवाड,फिरोज खान,दीप चव्हाण,संजय घुले आदी उपस्थित होते.
बाळासाहेब भुजबळ म्हणाले,माळीवाडा येथे महात्मा फुले व सावित्रीआई फुले पूर्णाकृती पुतळा भव्य दिव्य असे स्मारक लवकरच पूर्णत्वास येत असल्याने समाजामध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. माळीवाडा वेस पाडावी या महात्मा फुले दांपत्य स्मारक समितीच्या ठरावाला शहरातील प्रमुख समाज, विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळे यांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे.लवकरच माळीवाडा परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. . .



