जिल्हास्तरीय परीक्षेत इंदोरीच्या प्रवरा विद्यालयाचे घवघवीत यश!

अकोले /प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य अध्यापक मंडळ व अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत प्रवरा विद्यालय इंदोरी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यशसंपादन केले
..प्रवरा विद्यालय इंदोरी येथील इयत्ता पाचवीचे 11 तसेच सहावीचे 12 ,नववीचे 17 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी पाचवीचे 9 व सहावीचे 5 विद्यार्थी जिल्हा प्रज्ञा प्राप्त झाले आहेत.त्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण सावंत यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक सावंत तसेच ज्येष्ठ शिक्षक जाधव के. ए. खारके, मुंतोडे एस बी, संजय खतोडे, देशमुख ए एस, देशमुख पी एस, श्रीरंग गोडे, जालिंदर वाघ, शशिकांत चौधरी, विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ सविता मेहेत्रे, सौ.शितल बिबवे, सौ सीमा धुमाळ, सौ.लक्ष्मी मुंडे यांनी कौतुक केले आहे.