रणंद बु. (ता अकोले) येथे 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अकोले प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रणद बुद्रुक ता अकोले येथे 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम विविध घोषणा देत विद्यार्थ्यांची गावात प्रभात फेरी काढण्यात आली. शहीद जवान श्री.बाळासाहेब देशमुख यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत रणद बुद्रुक च्या कार्यालयासमोर गावचे विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. विठ्ठल पोरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रणद बुद्रुकच्या प्रांगणात तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री. गणपत पटेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
रणद बुद्रुक गावचे सरपंच श्री. सुंदरलाल भोईर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषयावर भाषणे केली. विद्यार्थ्यांनी ओ देश मेरे, ए मेरे वतन के लोगो, शेतकरी गीत, फुले सावित्री नसती तर, या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे, या गीतांवर सुंदर नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांना भरभरून प्रतिसाद दिला.
केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा आणि सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा यामध्ये विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथार्थ गौरव करण्यात आला. गावचे सुपुत्र श्री. अविनाश देशमुख ( कनिष्ठ अभियंता, रत्नागिरी ) यांनी शाळेसाठी खुर्च्या भेट दिल्या तर बीएमसी कामगार श्री. भगवान पटेकर यांनी विद्यार्थ्यांना पेन व कंपास पेटी साहित्य वाटप केले. ‘शाळेला गावाचा आधार असावा, आणि गावाला शाळेचा अभिमान वाटावा’ असेच चित्र या प्रसंगी दिसून आले.
याप्रसंगी गावचे सरपंच श्री. सुंदरलाल भोईर, उपसरपंच श्री. मच्छिंद्रनाथ कोरडे, ग्रामसचिव श्री. काकड भाऊसाहेब, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री. गणपत पटेकर, विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. विठ्ठल पोरे गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. मंगळा पटेकर गावचे पोलीस पाटील श्री. बाळू पटेकर ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. मीनाताई पटेकर अंगणवाडी सेविका श्रीमती वैशालीताई पटेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. लक्ष्मण पटेकर, सौ. चंद्रभागा मराडे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष श्री गोविंदा थिगळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गणपत पटेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. गणपतराव देशमुख माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष देशमुख व सर्व सदस्य, अपंगसेल आर. पी. आयचे अपंग सेल चे तालुकाध्यक्ष श्री. शंकर वायळ, शाळेचे मुख्याध्यापक श्री. नाडेकर सर, उपाध्यापक श्री. जाधव सर ,श्री. मडके सर, श्री. धिंदळे सर, आरोग्य विभागाचे डॉक्टर श्री. गहिरे, डॉक्टर श्री. बढे आणि परिचारिका सौ. नाडेकर ताई तसेच गावातील तरुण मित्र मंडळ गावकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर. पी. आयचे तालुकाध्यक्ष श्री. विजयभाऊ पवार यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. गावचे तरुण श्री. भाऊराव कोरडे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय व भारताचे संविधान याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुंदरलाल भोईर यांनी गावाला संबोधित करून शिक्षणाचे महत्त्व व गावाचा विकास याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
शेवटी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रोहिदास जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. शरद मडके सर यांनी केले.