सोशल मीडियाच्या माध्यमातून उंचखडक येथील राममंदिरासाठी मिळाली 36 हजाराची देणगी …!!

अकोले प्रतिनिधी
: अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील श्री क्षेत्र राममाळ येथे पौराणिक श्रीराम मंदिराच्या नवनिर्माणाचे काम सुरू आहे ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव .गावकऱ्यांनी तसेच तालुक्यातील अनेक मान्यवरांनी या मंदिर उभारणीसाठी मदत केली आहे तर काही भाविक भक्त होईल तशी मदत करत आहेत. गावचे सुपुत्र तात्यासाहेब देशमुख यांनी २२ जानेवारीला म्हणजेच अयोध्येतील राम लल्लांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या शुभमुहूर्तावर आपल्या मित्र परिवाराला राममंदिराच्या उभारणीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले असता अनेक मित्र मंडळींनी मिळुन तात्यासाहेब देशमुख यांच्याकडे ३६२०१ रुपये देवस्थानला देणगीरुपी मदत केली.
तात्यासाहेब देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करत तब्बल ५०० ऊसतोडणी कामगारांना गृहोपयोगी ११ वस्तूंच्या संचाचे वाटप केले होते.सामाजिक कार्यासोबतच शैक्षणिक कार्यात देखील जेंव्हा उंचखडक बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेसाठी उंचखडक बुद्रुकचे कार्यक्षम माजी सरपंच विद्यमान उपसरपंच महिपाल देशमुख यांनी एलसीडी टीव्ही व काही क्रीडा वस्तूंची मागणी केली होती तेंव्हा त्यांनी तात्काळ अंधेरी येथील जनकल्याण ग्रुपशी संपर्क करत या वस्तू शाळेसाठी मिळवून दिल्या.
शांताई सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेकदा आपल्या आज्जी आजोबांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने ऊसतोडणी कामगारांना “एक मायेची ऊब” म्हणून ब्लँकेटचे देखील वाटप करत केले
श्री क्षेत्र उंचखडक बुद्रुक येथील पुण्य श्री क्षेत्र राममाळ अशा पवित्र भुमीमध्ये भव्य दिव्य प्रभु श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे तरी आपल्या स्वेच्छेने कींवा आपल्या माता पित्यांच्या स्मरणार्थ देणगीरुपी मदत करुन दगडी शिळा लावल्याचे भाग्य मिळवावे तसेच तरुणांनी सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी केला तर नक्कीच त्याचा फायदा सामाजिक कर्यात करुन घेता येतो,गावातील अनेक तरुण-जेष्ठ नोकरी,उद्योगधंद्यांसाठी बाहेरगावी आहेत त्यांनी देखील “फुल नाही तर फुलाची” या उक्तीप्रमाणे या मंदीर उभारणीकरता हातभार लावावा असे आवाहन तात्यासाहेब देशमुख यांनी तालुक्यातील, उंचखडक गावातील भाविक भक्तांना,तरुणांना केले त्याचबरोबर ज्या मित्र परिवाराने आपण केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला त्या सर्वांचे आभार व्यक्त केले.देशमुख यांनी जमलेली देणगी देवस्थानचे हीशोबनिस भाऊसाहेब देशमुख यांच्याकडे सुपुर्त केली यावेळी उंचखडक बुद्रुक सेवा सोसायटीचे संचालक जेष्ठ मार्गदर्शक शांतारामआप्पा देशमुख, उंचखडक बुद्रुक गावचे उपसरपंच महिपाल देशमुख,देवस्थानचे विश्वस्त देवराव पाटील शिंदे, कुंडलिक मंडलिकसाहेब,विलासराव हासे,राजेंद्रभाऊ शिंदे,रमेशनाना मंडलिक,धोंडीभाऊ देशमुख, रमेशनाना कडलग,सर्जेरावमामा चासकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
———