विकासकामात भेदभाव करणार नाही – मोनिकाताई राजळे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांचे सरकार आल्यावर मागील वर्षांच्या कार्यकाळात सरकार नसल्याने नुसत्या घोषणा केल्या गेल्या, सरकार सत्तेवर आल्यानंतर मतदारसंघात अडीचशे कोटीचा निधी ग्रामीण रस्त्यांसाठी आणता आला. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ७० कि. मी. रस्ते मंजूर झाले. असून तीन राज्यमार्गांच्या चौपदरीकरणाच्या रस्त्यांनाही मंजुरी मिळाली.असल्याची माहिती शेवगाव -पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.
शेवगाव तालुक्यातील विविध गावातील विकास कामाचे उद्घाटनानंतर भातकुडगाव येथील भातकुडगाव -नजन वस्ती ते भायगाव रस्ता खडीकरण व डांबरीकरण सुधारणा करणे कामासाठी दोन कोटी रुपयाचे कामाचे भूमिपूजन शेवगाव – पाथर्डीच्या कर्तव्यनिष्ठ आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत केले. यावेळी ग्रामस्थांची संवाद साधला. यापुढील काळात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.
यावेळी बापुसाहेब भोसले, बापुसाहेब पाटेकर, वाय.डि. कोल्हे, ताराचंद लोढे, भीमराज सागडे, मुसाभाई शेख, लक्षमण काशिद, संदिप खरड, डॉ शामराव काळे, रामदास बडे, महादेव पवार, संतोष आढाव आप्पासाहेब सुकासे, रणजित घुगे, सुरेश थोरात, संतोष खंडागळे, सुभाष बडधे, नवनाथ फासाटे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन रमेश कळमकर यांनी केले. तर डॉ. श्याम काळे यांनी आभार मानले.
काही वर्षापासून बंद असलेला भातकुडगाव येथील पशु वैद्यकिय दवाखाना नव्याने महाराष्ट्र शासन श्रेणी – १ पशु वैदयकिय दवाखाना भातकुडगाव येथे मंजुर करावा. भातकुडगावसह परिसरात मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याची अत्यंत गरज आहे. यामागील काळात उपलब्ध दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पशुधनाविषयी शेतकऱ्यात जागृती करून चांगली सेवा देऊन भातकुडगावसह परिसरात पशुधन वाढीस मोठी मदत केली आहे. त्यामुळे भातकुडगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाना उपलब्ध व्हावा अशी मागणी डॉ. शाम काळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने मागणी केली.