इतर

समाजाला विचार पेरणा-या माणसांची गरज माजी आमदार डॉ.सुधीर तांबे


संगमनेर -प्रतिनिधी


वर्तमानातील निर्माण झालेल्या परीस्थितीला सामोर जाण्यासाठी समाजाला विचार पेरणा-या माणसांची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले.ते सुजात फौंडेशनच्या वतीने आय़ोजीत पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके उपस्थिती होते.

व्यासपीठावर पुरस्कार्थी डॉ.सोमनाथ मुटकुळे सौ.विजया मुटकुळे,कवी प्रा.संतोष पवार,प्रा.मिलींद कसबे ,सूर्यकांत शिंदे,प्रा.के.जी.भालेराव उपस्थित होते.


डॉ.तांबे आपल्या भाषणात म्हणाले की,समाजात वाढत जाणारी वाईट परीस्थिती लक्षात घेता त्यावर मात करण्यासाठी कवी,साहित्यिक यांचे साहित्य अधिक महत्वाची भूमिका बजावू शकते.दिनकर साळवे यांच्या सारखा कार्यकर्ता कवी ,लेखकाना समाजाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका घेतली असल्याचे सांगत त्यांनी सोमनाथ मुटकुळे यांच्या नाटयलेखनाबददल कौतुक उदगार काढले.सुधीर लंके आपल्या भाषणात म्हणाले की,संगमनेर अकोलेची भूमी ही क्रांतीकारक,विचारवंताची आहे.साहित्य हे नेहमीच क्रांतीची भाषा करत असते.शाहिरी वाडःमय हे कधीच मरत नाही.खरेतर शब्दात मोठी ताकद आहे.आज लोकशाहीचे सर्वंच स्तंब संकोच पावत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.आज लिहिणा-याच्या नावाने लिहिणा-या माणसाला पुरस्कार दिला जातो आहे हे अधिक महत्वाचे आहे.जगात जेव्हा झुंडशाहीचे वाढत जाते तेव्हा चिंता करावी अशी परीस्थिती निर्माण होत असते पण कोणतीही झुंडशाही ही ज्ञानाशी नाते सांगणारी असत नाही.आज सांस्कृतिक गळचेपी होत आहे.आपल्याला अजूनही शाहू,फुले,आंबेडकराचे विचार समजले नाही म्हणून आरक्षणाच्या प्रश्नांवर समाजात संघर्ष उभे ठाकले जात आहे.वर्तमानात महापुरूषांचे विचार जतन करण्याची गरज आहे.वर्तमानात समाजमन घडविणा-या चळवळी क्षीण झाल्या आहेत.माणसाने संवाद व विचार करू नये अशी एक व्यवस्था उभी केली जात असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.


यावेळी सत्काराला ड़ॉ.सोमनाथ मुटकुळे यांनी उत्तर देत आपल्या नाटयलेखनाचा प्रवास आणि त्यामागील प्रेरणा विषद केली.यावेळी राज्य शासनाचा अण्णाभाऊ साठे समाजसेवा पुरस्कार जाहीर झाल्याबददल ज्ञानेश्वर राक्षे व श्री विश्वनाथ आल्हाट यांचा मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रा.पवार यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलींद कसबे यांनी केले.आभार पोपट सोनवणे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले.कार्यक्रमास राजाभाऊ अवसक,बाबा खरात,सिताराम राऊत,वसंत बंदावणे,गणेश बो-हाडे,प्रशांत पाटील,प्रा.राहुल हांडे,राजू साळवे,प्रदीप जोरवर,रवींद्र येवले,गौतम मिसाळ,सुखदेव मोहिते,जिजाबा हासे,सचिन साळवे,विनोद गायकवाड,निलेश कसरू आदीस अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button