शिक्षक यशवंत घोडे यांना इंडियन एज्युकेशनल एक्सेलेन्स राष्ट्रस्तरीय पुरस्कार

राजूर /प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले कविवर्य श्री यशवंत घोडे सर यांना ग्लोबल गोल्ड टेलेंट बुक ऑफ रेकॉर्ड नवी मुंबई संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल राष्ट्रस्तरीय डंडियन एज्युकेशनल एक्सेलेन्स अवार्ड देऊन गौरविण्यात आले.
१०मार्च रोजी आग्री मंगल कार्यालय कामोठे नवी मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात जगविख्यात जादूगार सतीश देशमुख प्रमुख पाहुणे होते. अमरावती जिल्ह्याचे डीएसपी दत्ताराम राठोड साहेब, टीव्ही 9 च्या वृत्तनिवेदिका निकिता पाटील मॅडम, संस्था उपाध्यक्ष श्रीराम महाजन साहेब अतिथी उपस्थित होते.
कविवर्य यशवंत घोडे या़चे निसर्गाचे पूजक , निसर्गाचे उपासक हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले असून बुक ऑफ रेकॉर्ड महाराष्ट्र मध्ये नोंद झाली आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये कविता व लेख प्रकाशित झालेले आहेत.
विविध पशु पक्षांचे आवाज काढण्याची कला आहे. ते अकोले तालुक्यातील अतिदुर्गम फोफसंडी या गावातील रहिवासी आहेत. तेथील निसर्ग विषयी बरेच लेख प्रकाशित केले आहेत
तसेच नक्षत्रांचे देणं काव्यमंच चे सभासद असून ४ प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहे.
तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद चे सभासद आहेत.
कवी साहित्यिक लेखक आपल्या भेटीला, मराठी भाषा, गणित दिन विज्ञान दिन,आठवडे बाजार, परसबाग असे शालेय पातळीवर विविध उपक्रम राबवलेले आहेत. त्यांचे विद्यार्थ्यांनी सुद्धा बाल कविता तयार करतात.बाल काव्यमंच स्थापन केला आहे. आज पर्यंत २००० कवितांचे लेखन केले आहे.आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच विविध काव्य मैफिल, काव्य सहली,काव्य संमेलनामध्ये सहभागी झाले आहेत.काव्य क्षेत्रात नक्षत्र गौरव पुरस्कार,शा़ंताबाई शेळके काव्यरत्न पुरस्कार,पी सावळाराम राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार, वृंदावन फाउंडेशन गुरुजन गौरव पुरस्कार,कालिदास काव्यरत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
इंडियन एज्युकेशनल एक्सेलेन्स या पुरस्कारासाठी 450 प्रस्ताव आले होते त्यापैकी 30जणांची निवड करण्यात आली.
त्यांच्यासह राज्यभरातून कला क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा आकर्षक सन्मान चिन्ह, गोल्ड मेडल,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात करण्यात आले.
