लग्नात सत्काराला फाटा देत पाहुण्यांना दिली पुस्तकांची भेट!

संगमनेर प्रतिनिधी
लग्नासारख्या कार्यक्रमात उपस्थितांचे सत्कार ही अनिवार्य गोष्ट ठरली आहे.यासाठी वधू आणि वर या दोन्ही परिवाराकडून मोठा खर्च होत असतो. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कापडाचा दर्जाही चिंतेचा विषय असतो अशावेळी त्या वस्तू न वापरता आणि त्या परंपरेला फाटा देत संगमनेर येथील उद्योजक वाल्मीक चौधरी यांनी भाच्याच्या लग्नामध्ये पुस्तक भेट देऊन नव्या परंपरेची वाट निर्माण केली. त्यांनी सुरू केलेल्या या परंपरेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अकोले तालुक्यातील विनोद विठ्ठल जाधव हे उद्योजक वाल्मीक चौधरी यांचे भाचे आहेत व संगमनेर येथील ऐश्वर्या बाळासाहेब म्हस्के यांच्याशी त्यांचा विवाह नुकताच संपन्न झाला. या विवाहाचे निमित्ताने आलेल्या मान्यवरांना शाल ,टोपी ,टॉवेल यासारख्या वस्तू देऊन सन्मान न करता त्यांनी आलेल्या सुमारे एक हजाराहून अधिक लोकांना संदीप वाकचौरे यांनी लिहिलेल्या आणि चपराक प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या शोध शिक्षणाचा या अडीशे रुपये किंमतीच्या पुस्तकाची भेट दिली आहे. यामुळे उपयोगात न येणाऱ्या आणि पैसा वाया जाणाऱ्या परंपरेपेक्षा उपस्थित असलेल्या आप्तेष्ट व नातेवाईकांना. पुस्तक भेट दिल्याने अनेकांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहेत.
लग्न समारंभाचे निमित्ताने यासारखे उपक्रम करून बहुजन समाजाच्या शहाणपण विकास प्रक्रियेत हातभार लागला गेला तर समाजाची उन्नती साधने शक्य होणार आहे. त्यामुळे या वाटा चालण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असल्याची मते उपस्थित आणि व्यक्त केले.
लग्नासारख्या विधीमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च ही चिंतेची बाब आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर खर्च वाया जाणारा असतो. त्यामुळे या परंपरांना छेद देण्याचे काम वाल्मीक चौधरी यांनी सत्कार फाटा देऊन उपस्थितांच्या हाती पुस्तक देण्याचा उपक्रम हा अधिक कौतुकास्पद आहे .यामुळे या माध्यमातून समाज प्रबोधन घडू शकेल. ही परंपरा समाजातील सर्व घटकांनी अनुकरण करण्याची गरज आहे.
–गोरक्षनाथ मदने पत्रकार –

हे धाडस अधिक कौतुकास्पद.. पाटील
लग्नासारख्या परंपरेत शाल ,श्रीफळ टॉवेल टोपी यासारखे विविध वस्त्र देऊन सत्कार केला जात असतो. यात होणारा खर्च हा एका अर्थाने वाया जाणार असतो. यातील अनेक वस्तूंना दर्जाही नसतो .मात्र असे असताना किंवा परंपरा म्हणून सत्कार केला जात असतो. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही ही परंपरा अधिक रुजली आहे. मात्र ग्रामीण भागातील वाल्मीकराव चौधरी यांच्या सारखा उद्योजक पुढे येऊन ही परंपरा मोडीच काढत उपस्थितांच्या हाती पुस्तक देऊन मस्तक घडविण्याचा विचार करतो की बाब अधिक आदर्शवादी आहेत. समाजाने अशा परंपरा निर्माण करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.
घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन ,पुणे
मस्तक घडविण्यासाठी पुस्तक.. चौधरी
ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये अनेक चांगल्या वाईट प्रथा,परंपरा आहेत.त्या परंपराचा वर्तमानात पुनर्विचार करण्याची गरज आहे.त्यामुळे भाच्याच्या लग्नविवाहामध्ये सत्काराच्या कार्यक्रमाला फाटा देऊन उपस्थितांच्या हाती पुस्तक देण्याचा निर्णय घेतला. पुस्तकामुळे बहुजनांची मस्तक घडविण्याचा वाट निर्माण होईल ही धारणा मनात आहे . लग्नातील सत्कारात होणारा खर्च वाया जाणार असतो हे अनेक कार्यक्रमात अनुभवले आहे. त्यामुळे पुस्तक दिले तर विचार समृद्ध होतीलआणि समाजामध्ये सुधारणाची वाट चालण्याची शक्ती मिळेल अशी अपेक्षा आहे.यामुळे या परंपरेची वाट चालण्याचा निर्णय घेतला.
वाल्मीक चौधरी,समर्थ उद्योग समूह