इतर
अकोल्यातील ॲड. श्री दिपक शेटे यांची नोटरी पब्लिक पदी नियुक्ती

अकोले (प्रतिनिधी)
अकोले येथील न्यायालयात वकिली करणारे प्रतिथ यश वकील ॲड. दिपक शेटे यांची भारत सरकारच्या पब्लिक नोटरीपदी नुकतीच निवड झाली आहे.
भारत सरकारच्या न्याय व विधी विभागाने नोटरी पब्लिक म्हणून निवड झालेल्या वकिलांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
मागील वर्षी ऑनलाईन पद्धतीने मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्याचा निर्णय ऑनलाइन यादी प्रसिद्ध करून झाला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे अकोले तालुका ग्राहक पंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. ॲड शेटे हे अगस्ती सह. साखर कारखान्याचे १५ वर्ष कायदेशीर सल्लागार कार्यरत आहेत. त्याचबरोबर यशोमंदिर पथसंस्थेचे १५ वर्ष, एम एस ई बी चे (विज वितरण कंपनी) ३ वर्षापासून कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.
त्यांच्या निवडीची माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड, खासदार श्री सदाशिवराव लोखंडे, मा. आ वैभवराव पिचड, सरचिटणीस सिताराम भांगरे, ज्येष्ठ नेते जालिंदर वाकचौरे, गिरजाजी जाधव, यशवंत आभाळे, मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, भाऊसाहेब वाकचौरे (पत्रकार), दत्तात्रय शेनकर, राहुल देशमुख, राम रुद्रे, नंदकुमार देशमुख, कैलास तळेकर, दत्ता ताजणे, ॲड भाऊसाहेब वाळुंज, ॲड राम भांगरे, राजेन्द्र घायवट, रामदास पांडे, अगस्ति पथ संस्थेचे संचालक तथा नगरसेवक प्रमोद मंडलिक, रमेश नाईकवाडी, श्याम वाळुंज, संपत मालुंजकर, बाबाजी वैद्य, राजेश खैरे, आदिंनी अभिनंदन केले आहे.