अकोले शहरातील गटारी धनदांडग्यांच्या सोयी नुसार!

अकोले प्रतिनिधी
अकोले शहरातील चालु असलेले कॊल्हार घोटी राज्यमार्ग रस्त्याच्या कडेला बंधिस्त गटारींचे बांधकाम निकृष्ट होत आहे..
अकोले येथील कोल्हार घोटी राज्यमार्ग रस्त्याच्या कडेला चालु असेलेल्या गटारींचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालु आहे.. ह्या गटारींना कुठलाही ढाळ..किंव्हा व्यवस्थित असं कुठलीही स्वरूप दिसत नाही… निव्वळ रस्त्याचे खोदकाम करून ठेवायचे व वाटेल तेव्हा वेळ काढून त्या कामाला मुहूर्त काढून हात लावायचा असा प्रकार येथील ठेकेदारांचा चालु आहे..

यामुळे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीसोबत ह्या त्रासाला समोरे जावे लागत आहे.. त्यामुळे सदरील व्यावसायिक व नजीकचे ग्रामस्थ लवकरात काम पुर्ण व्हावं व उत्तम दर्जाचे व्हावे अशी मागणी वारंवार प्रशासनाकडे करत आहेत.
सदरील गटारींचे काम निविदेप्रमाणे होत नाही. राज्य मार्ग रस्त्याचे रुंदीप्रमाणे रस्त्याची रुंदी एक सारखी दिसत नाही. त्यामुळे गटारींची हद्द चुकली आहे. रस्त्याच्या लगतच्या साईडपट्ट्या ह्या अधिकाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने टाकण्यात आल्या आहेत.. तर ह्या होणाऱ्या गटारींच्या बाजूला असणाऱ्या धनदांडग्या लोकांच्या दुकानदारांच्या मर्जीप्रमाणे वशिलेबाजी करून अनेक इमारती दुकानदारांच्या सोयीनुसार वाचवण्यात आल्या आहे. हया गटारींच्या कामावर गाडी ही सिमेंट काँक्रेटचा माल तयार करून येते तो माल हा कोणत्या दर्जाच्या बनवला जातो ..बरोबर सिमेंट खडी वापरली जाते कि नाही ह्याची कोणलाही अद्याप कल्पना नाही.. येणाऱ्या पावसाचे पाणी गटारीत जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था केलेली नाही.. त्यामुळे नवीन तयार केलेला नवीन रस्ता हा लवकरच खचून जाणार आहे.. साधारणतः 2 वर्ष टिकतो कि नाही अशी शंका तयार होत आहे..
चालु असलेल्या गटारींचे बोगस काम करणाऱ्या ठेकेदार ह्याला प्रशासनाणे कामाचे पेमेंट अदा करू नये.. तसेच ह्या महाशयांचे नाव काळ्या यादीत टाकावे.. तसेच अश्या पद्धतीचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार ह्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकारी यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी दलितमित्र प्रकाश साळवे यांनी केली आहे… आणि कारवाई न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर व अकोले यांचे कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे–

–/////—-