इतर
धोंडीराम मंडलिक यांचे निधन

अकोले – प्रतिनिधी
– सेवानिवृत्त मुंबई पोलीस अधिकारी धोंडीराम गणपत मंडलिक (वय 73 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते प्रेमळ, सुस्वभावी, अध्यात्मिक व परोपरकारी स्वभावाचे होते.
त्यांच्या पश्चात मुली शुभांगी, दिपाली, मुलगा प्रविण, भाऊ संतु व अशोक असा परिवार आहे. ते मा.नगरसेवक प्रमोद मंडलिक यांचे चुलते तर नगरसेविका सौ.विमल मंडलिक यांचे दिर होते.
पोलीस खात्यात नोकरीस असुनही, त्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते. त्यामुळे पोलीस खात्यातील देव माणुस म्हणून त्यांची समाजाला ओळख होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.