अहमदनगर

कोतुळ येथे आंबेडकर पदस्पर्श स्मृती सोहळा संपन्न!

कोतुळ प्रतिनिधी

विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1941 साली कोतुळ येथे पहिली महिला परिषद घेतल्याची नोंद सापडते, त्यांच्या पदस्पर्षlने पावन झालेल्या कोतुळच्या भूमीत प्रति वर्षी 27 एप्रिल रोजी, पदस्पर्षभूमी सोहळा मोठया उत्साहाने साजरा केला जातो,

विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा विशेष गौरव आयोजकांकडून केला जातो या वर्षीचा युवा गौरव पुरस्कार अत्यंत कठीण, व खडतर प्रवास करून असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स ऑफिसर( सहायक राज्य विक्रीकर आयुक्त ) झालेले संतोष (शिवा)शांता अशोक शेळके ,कोतुळ यांना सन्मानपूर्वक देण्यात आला, त्याच प्रमाणे, डॉ,तेजस्विनी पोपट सोनवणे, व डॉ, स्वप्नील साळवे, यांनाही पुरस्कlराने गौरविण्यात आले.


आंबेडकरांनी सन 1941 मध्ये पहिली महिला परिषद घेतलेल्या माळीवाड्यातून आंबेडकर प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली,पुढे ज्या वाड्यावर आंबेडकर आले होते, (भाऊ दाजी पाटील यांचा जुना वाडा)तेथे मान्यवरांच्या हस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन झाले,
आंबेडकरांच्या या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानीं असलेले अडव्होकेट संघराज रुपवते यांनी आंबेडकरांचा गतकालीन इतिहास मांडत श्रोत्यांची मने जिंकली, प्रमुख व्याख्याते जगदीश ओहोळ यांनी आपल्या आकर्षक शैलीतून आंबेडकरांचा गतकाल वर्णन केला ,कामगार नेते अजित नवले, विजय वाकचौरे ,जुन्या वाड्याचे मालक रविंद्र देशमुख, बी जे देशमुख,यांनी आपले प्रभावी विचार आपल्या भाषणातून प्रकट केले,


उत्कर्षl रुपवते, लिज्जतचे सुरेशराव कोते,पोपटराव सोनवणे,डॉ सुधाकर शिंदे,चंद्रकांत सरोदे, शांताराम संगlरे, पत्रकार सागर शिंदे,कोतुळचे उपसरपंच संजय देशमुख, सामाजिक कार्यात सतत पुढे असणारे रवी आरोटे,शांताराम देठे, पोलीस पाटील देशमुख, व कोतुळ ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद स्पर्श भूमी अआयोजक सोहळ्याच्या सर्व कार्यकर्त्यांसह गौतम रोकडे, संदिप बर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button