पळवे बुद्रुक येथील सचिन गोरे यांची पुणे ग्रामीण पोलीस मध्ये निवड

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
देश सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही पुन्हा देशाची व जनतेची सेवा करण्याची ओढ असलेले पळवे बुद्रुक येथील रहिवासी नुकतेच निवृत्त झालेले मेजर सचिन गोरे यांची पुणे ग्रामीण पोलीस मध्ये नुकतीच निवड झाली आहे.
निवड झाल्यानंतर ते तात्काळ कामावरही रुजू झाले आहेत. त्याबद्दल पळवे बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यामध्ये प्रामुख्याने सुरेश भाऊ कळमकर सामाजिक कार्यकर्ते, सुदामराव मगर मा.चेअरमन, विनायकराव पवार अध्यक्ष निलेश लंके प्रतिष्ठान पळवे बुद्रुक, बाळासाहेब कळमकर सरपंच, बशीर भाई तांबोळी सामाजिक कार्यकर्ते, निलेश पळसकर, संपतराव पळसकर सोसायटी सदस्य, रामभाऊ कळमकर आदर्श शेतकरी, गोरे मामा सोसायटी सदस्य, श्री गणेश साळवी आपोलो कंपनी, आदी मान्यवरांनी त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
