अकोले येथे मोफत हृदयविकार तपासणी शिबिर

अकोले प्रतिनीधी
– एस.एम.बी.टी. हॉस्पिटल धामणगाव व हरिश्चंद्र हॉस्पिटल अकोले यांच्या वतीने मोफत हृदय विकार तपासणी शिबिर बुधवारी दि.22 रोजी अकोले येथे आयोजित केले आहे.
एस.एम.बी.टी. चे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. गौरव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हे शिबीर आयोजित केले आहे.शिबीर बुधवारी सकाळी 10 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत असून शिबिराचे ठिकाण डॉ.एम के भांडकोळी यांचे हरिश्चन्द्र हॉस्पिटल अकोले येथे आहे.
शिबिरात मोफत हृदयविकार तपासणी व आणि अल्प दरात उपचार शिबीर तसेच महात्मा जोतिबा फुले जनरोग्य योजने अंतर्गत उपचार व अल्पदारात 2 डी इको करणार आहेत. शिबिरामध्ये बी. पी. शुगर, ईसीजी मोफत केला जाणार आहे. छातीत दुखणे, जळजळणे, चालताना जास्त दम लागणे, डाव्या बाजूच्या जबड्यास वेदना होने छातीवर भार वाटणे, अचानक दरदरून घाम येणे, डाव्या हाताला मुंग्या येणे, लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असणे, वजन न वाढणे असे लक्षणे असल्यास या शिबिराचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.