आजचे पंचांग व राशिभविष्य दि २२/०३/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०१ शके १९४४
दिनांक :- २२/०३/२०२२,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३९,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति २८:२२,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति २०:१४,
योग :- हर्षण समाप्ति १३:०९,
करण :- कौलव समाप्ति १७:२४,
चंद्र राशि :- तुला,(१४:३३नं. वृश्चिक),
रविराशि – नक्षत्र :- मीन – उ. भा.,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अनिष्ट दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:३८ ते ०५:०९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ११:०५ ते १२:३६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३६ ते ०२:०७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०९ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
रंगपंचमी, भा. चैत्र मासारंभ शके १९४४, दग्ध २८:२२ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०१ शके १९४४
दिनांक = २२/०३/२०२२
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
घरातील वातावरण प्रसन्न असेल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. दिवस मजेत जाईल. तरुण वर्गाला नवीन संधी मिळेल. घरात टापटीप ठेवाल.
वृषभ
जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत. भावंडांचे सहकार्य मिळेल. मोठ्या लोकांच्यात वावराल. आवडत्या कामासाठी वेळ मिळेल.
मिथुन
आवडीचे पदार्थ खायला मिळतील. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरातील कामात मन रमेल. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. जोडीदाराचे वर्चस्व राहील.
कर्क
मनमोकळे वागाल. आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. स्वच्छंदीपणे वागण्यावर भर द्याल. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल.
सिंह
मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. नामस्मरण करण्यात वेळ व्यतीत करावा. अंगीभूत कलेचे योग्य कौतुक केले जाईल. जोडीदाराच्या शांत स्वभावाची प्रचिती येईल.
कन्या
उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. स्थावरची कामे मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल.
तूळ
प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. भावंडांचा विरोध होऊ शकतो. काही गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहावे. प्रलोभनाला बळी पडू नका. भागिदारीतून चांगली कमाई करता येईल.
वृश्चिक
घशाचे विकार जाणवू शकतात. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खरेदी करावी. काही कामात अधिक श्रम घ्यावे लागतील. कामात उतावीळपणा करून चालणार नाही. गोड बोलण्यावर भर द्यावा.
धनू
स्वभावात काहीसा हेकटपणा येईल. स्वातंत्रप्रियता दर्शवाल. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. हातात नवीन अधिकार येतील. भावंडांचा सहवास लाभेल.
मकर
चिकाटीने कामे कराल. जबाबदारीने वागणे ठेवाल. घराची साफसफाई काढाल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. कमिशन मधून चांगली कमाई होईल.
कुंभ
स्थावरच्या कामात यश येईल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामात समाधानी राहाल. जवळचे नातेवाईक भेटतील. परिस्थितीशी जुळवून घ्याल.
मीन
झोपेची तक्रार कमी होईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. सट्टा, जुगार यातून चांगली कमाई होईल. छंद जोपासायला वेळ काढाल. अपवाद नजरेआड करावेत.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर