श्रीराम महिला औद्योगिक सहकारी संस्थेस जिल्ह्यातील पहिले आय.एस.ओ मानांकन

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान
संगमनेर /प्रतिनिधी :
पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष एस झेड देशमुख यांच्या मार्गदर्शनखालील श्रीराम महिला औद्योगिक सहकारी संस्थेस अहमदनगर जिल्ह्यातील पहिले आय एस ओ मानांकन प्राप्त झाले संस्थेच्या चेअरमन सौ सरस्वती गुंजाळ व व्हा चेअरमन सौ रोहिणी सोनवणे यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल तसेच राज्याचे महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रमाण पात्र स्वीकारले.
१९९२ साली इंदिरानगर परिसरातील महिलांना मुख्य प्रवाहात आणून श्रीराम महिला औद्योगिक सहकारी संस्थेची एस झेड देशमुख यांनी स्थापना करून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले, देशमुख स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असल्याने अत्यंत करड्या शिस्तीत त्यांनी संस्थने पुढे नेली, संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या रेशन दुकानात अत्यंत पारदर्शी कार्य करून गोर गरिबांपर्यंत अन्न धान्य पोहोचविण्याचे कार्य केले याचीच दाखल घेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल व राज्याचे महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संस्थेला आय एस ओ मानांकन प्राप्त झाले, विशेष म्हणजे जिल्ह्यातील हे मानांकन मिळवणारी हि पहिली संस्था आहे
यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना रेशन कार्डाचे वितरण करण्यात आले तसेच अनेक महिलांनी कोरोना काळात मोफत धान्य मिळाल्यामुळे पंतप्रधान मोदीजींच्या आभाराचे पत्रे केंद्रीय मंत्री सिंह यांना सुपूर्त केले
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या चेअरमन सौ सरस्वती गुंजाळ ,व्हा चेअरमन सौ रोहिणी सोनवणे,तसेच सर्व संचालिका,सचिव ,सभासद व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले