आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दाखल गुन्हा रद्द करण्याचा औरंगाबाद हायकोर्टा चा आदेश

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतूळ येथील प्रथीतयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. किसन भुजबळ व त्यांचे कुटुंबीयांबर घरातील महिला सदस्यास त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दलचा गुन्हा अकोले पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता.
यानंतर भुजबळ कुटुंबाविरुद्ध दाखल सदर फौजदारी गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून रद्द करून मिळण्यास आव्हान याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर
औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीनंतर भुजबळ कुटुंबातील पाच जणांविरुद्ध दाखल
तत्कालीन गुन्हा रद्द करण्याचे आदेश देऊन न्यायालयाने पाचही आरोपींची गुन्ह्यातून मुक्तता केली.अशी माहीती अकोल्यातील जेष्ठ विधिज्ञ किसन तथा के.डी. धुमाळ यांनी दिली. अकोले पोलीस ठाण्यात या तत्कालीन रजिस्टर घटनेतील मयत नातेवाईकाच्या फिर्यादीवरुन डॉ. किसन भुजबळ यांच्यासह कुटुंबातील ५ सदस्यांविरूद्ध गु.र.नं. १५२ / २०२० नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपत्र संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. मात्र सदर गुन्हा हा खोटा व बनावट असल्याने हा दाखल गुन्हा रद्द करून मिळण्यास भुजबळ कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती श्रीमती विभा कनकवडी व न्यायमूर्ती अभय बाघवसे यांच्यासमोर सदरचा खटल्याची सुनावणी झाली.या गुन्ह्यासाठी कोणताही पायाभूत आधार नसल्याचे दिसून येत आरोपींविरुद्ध कोणत्याही फौजदारी कलमाखाली सकृतदर्शनी पुरावा उपलब्ध नाही, असे लक्षातआल्यावर सदरचा खटला रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. या गुन्ह्यातील आरोपी डॉ. किसनभुजबळ यांच्यासह डॉ. रोहित भुजबळ, सौ. सुनंदा भुजबळ,राहुल भुजबळ व मंगल भुजबळ यांना दिनांक ९ डिसेंबर २०२२ रोजी सदर खटल्यातून उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. हा खटला रद्द झाल्यानंतर सूपूर्ण कोतूळ व परिसरातून भुजबळ कुटुंबियांवरील अन्याय दूर झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. औरंगाबाद खंडपीठात भुजबळ यांच्याकडून जेष्ठविधिज्ञ राजेंद्र देशमुख व देवांग देशमुख यांनी काम पाहीले.संगमनेर सत्र न्यायालयात अकोल्यातील विधिज्ञ के. डी.धुमाळ यांनी काम पाहीले.
——-