इतर

शिर्डी येथील तरुणाचा भंडारदरा धरणात बुडून मृत्यू!

अकोले प्रतिनिधी
भंडारदरा धरणात पोहण्याचा आनंद घेणाऱ्या एका पर्यटकाला जलसमाधी मिळाली आपल्या दोन मित्रां सोबत धरणात पोहताना त्याचा बुडून मृत्यू झाला हा युवक शिर्डी येथील आहे

आपल्या मित्रांसह शिर्डी येथील काही तरुण पर्यटनासाठी भंडारदऱ्याला गेले होते भंडारदरा धरण धरणाच्या पाण्यात उतरून पोहण्याचा आनंद घेत असताना या पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्याच्या या दुर्दैवतीने सर्वत्र हळद व्यक्त केली जात आहे

ही घटना आज दुपारी घडली. सद्दाम शेख,(वय 26, रा.पूनमनगर, शिर्डी) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.यापूर्वी ही धरणात पर्यटक बुडून मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे भंडारदरा धरण आता पर्यटकांच्या मृत्यूला निमंत्रण देणारे ठिकाण बनत आहे धरणाची सुरक्षितता राम भरोसे असल्याचे पुन्हा समोर आले आहे.सध्या पावसाळा सुरु
झाल्याने भंडारदरा परिसरात पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे

आज शिर्डी परिसरातील सहा तरुण भंडारदरा येथे पर्यटनासाठी आले होते. त्यातील काही जण भंडारदरा धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असता त्यातील
सद्दाम शेख हा तरुण पाण्यात बुडाल्याने त्याला जलसमाधी मिळाली आहे. राजूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन .स्थानिकांच्या मदतीने मयत सद्दाम चा मृतदेह पाण्यातून बाहेर काढलाअसून शवविच्छेदना साठी पाठविला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button