श्रीरामपूर परिवहन कार्यालयाच्या वतीने संगमनेरात वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी!

संगमनेर:-प्रतिनिधी
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर व देशमुख मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, संगमनेर यांच्या वतीने तालुक्यातील सर्व स्कुल बस चालक व राज्य परिवहन महामंडळातील चालक व शासकीय कार्यालयातील चालक यांच्यासाठी चालक दिनाचे औचित्य साधून मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन देशमुख मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल संगमनेर येथे स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या अध्यक्षा संज्योत वैद्य यांच्या हस्ते व डॉ. निलेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

याप्रसंगी राज्य परिवहन महामंडळ संगमनेर आगाराचे प्रशांत पाटील, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे, मोटार वाहन निरीक्षक धर्मराज पाटील, सहा. मोटार वाहन निरीक्षक प्रज्ञा अभंग, श्रीमती शितल तळपे, श्रीमती बाळसराफ, कुणाल वाघ, रोशन चव्हाण आदि उपस्थित होते.
यावेळी आरटीओ कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक श्री. पाटील यांनी वाहन चालकांना मार्गदर्शन केले. व संगमनेर तालुक्यासाठी शुन्य अपघाताचे लक्ष दिले. डॉ. निलेश देशमुख यांनी वाहन चालकांना डोळ्यांविषयी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. सौ. संज्योत वैद्य यांनी वाहन चालकांना मार्गदर्शन करतांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. या शिबीरात ज्या वाहन चालकांना चष्म्याचे निदान झाले असेल त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मोफत चष्मा देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन कामी उप प्रादेशिक कार्यालयातील प्रज्ञा अभंग, सुजाता बाळसराफ, शितल तळपे यांनी विशेष परिश्रम घेतले.
