नेवासा तालुका लॉयर्स कंझ्युमर को.ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन पदी ॲड.गोकुळ भताने!

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनीधी
नेवासा तालुका लॉयर्स कंझ्युमर को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन पदी ॲड.गोकुळ भताने व व्हाईस चेरमनपदी ॲड.बाळासाहेब काळे यांची बिनविरोध निवड झाली
नेवासा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नेवासा या कार्यालयाचे अधिकारी श्री ठोंबरे साहेब यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहीले व त्यांना श्री वणवे यांनी मदत केली .सदर निवडी ची सभा नेवासा वकील संघांचे कार्यालयात पार पडली. निवडीची सभा सुरु झाल्यानंतर चेअरमन पदासाठी एकमेव अँड भताने गोकुळ उत्तमराव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर व्हा.चेअरमन पदासाठी अँड भाउसाहेब बाळदेव काळे यांची निवड करण्यात आली .
या निवडीस संचालक मंडळ अँड बाळासाहेब चव्हाण अँड. अनंत दरंदले अँड. वसंतराव नवले . अँड उत्कर्षा मोटे. अँड सोमनाथ वाकचौरे अँड. सुभाष सकट अँड. सुदाम ठुबे अँड. रमेश पाठे. हे उपस्थित होते .

सदर निवडीचे नेवासा वकील संघांचे अध्यक्ष अँड कल्याणराव पिसाळ, तसेच संघाचे नेते जेष्ठ सदस्य अँड गणेशराव निकम, अँड. कैलासराव शिंदे,अँड प्रशांत माकाणे, अँड. प्रदीप वाखुरे, अँड. वैभव वाकचौरे, अँड. काका गायके,अँड.एस एम काळे, अँड एम आर कुटे, अँड बी एस शिरसाठ, अँड माधव काळे स्वागत केले आहे