क्राईम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग , आरोपीस १ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व १४ हजार रुपये दंड!


नेवासा -अल्पवयीन मुलीच्या विनयभंगा प्रकरणी आरोपी किरण संजय गायकवाड, वय २४ वर्षे, रा. खरवंडी, ता. नेवासा जि. अहमदनगर यास मा. जिल्हा व अति सत्र न्यायाधिश श्री. हरीभाऊ आर. वाघमारे साहेब यांनी एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये १४ हजार दंडावी शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता विष्णुदास कस्तुरराव भोर्डे यांनी काम पाहीले.

पीडीत अल्पवयीन मुलगी ही शाळेमधुन तिव्या साईकलवर घरी जात असतानी आरोपी याने रस्त्यामध्ये नदीच्या पुलाजवळ साईकल आडवून तिचा हात धरून तिस म्हणाला की, तुझ्याशी मला बोलायचे आहे तेवढ्यात एक समोरून मोटारसाईकल स्वार आला त्याला पाहून आरोपी पळून गेला. या घटणेबाबत पिडीताच्या आईने शनि-शिंगणापूर पोलीस स्टेशन ता.
नेवासा जि. अहमदनगर येथे गु.र.क्र. १०२ / २०२२ भा.द.वि. कलम ३४१, ३५४, ३५४-४, ५०६, ३४ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
सदर गुन्हयाचा तपास श्री. आर. टी. कर्पे यांनी करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले. सदर खटल्यात चौकशीकामी एकूण सात साक्षीदार सरकारपक्षातर्फे तपासण्यात आले. त्यापैकी पिडीता व पिडीताची आई तसेच, तपासी अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच, सरकारी
वकीलांनी केलेला प्रभावी युक्तिवाद मा. न्यायालयाने विचारात घूवन भा.द.वि. कलम ३५४ अन्वये दोषी धरून त्यास एक वर्षे तुरुंगवास व दंड रूपये ७,०००/- अशी शिक्षा दिली. तसेच, भा.द.वि. कलम ३५४-४
अन्वये आरोपी किरण यास दोषी धरून त्यास एक वर्षे तुरूंगवासाची शिक्षा व रुपये ७,०००/- दंड व दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिणे तुरूंगवास भोगावा तसेच, दंडाच्या रकमे पैकी रक्कम रुपये १०,०००/- अपीलाची मुदत संपल्यानंतर पिडीतास देण्यात यावी असा निकाल मा. न्यायालयाने दिला.
सदरच्या खटल्यात सरकारपक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता विष्णुदास कस्तुरराव
भोई यांनी काम पाहिले, पैरवी अधिकारी म.पो.कॉ. ज्योती नवगिरे, पो. कॉ. सुभाष हजारे, सहा. फौजदार एन. एल. चव्हाण, पो. कॉ. मुकुंद पोटफोडे यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button