सर्वोदय विदया मंदिर खिरविरे येथे गणित विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.

अकोले/प्रतिनिधी–
विदयार्थ्यांना खेळ,कला याचबरोबर वैज्ञानिक दृष्टीकोन देखील महत्त्वाचा मानला जातो. याच उद्देशाने अकोले तालुक्यातील सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे येथे विदयालयाचे प्राचार्य मधुकर मोखरे,विज्ञान शिक्षक रामदास डगळे,एस.एन.वाकचौरे,सौरभ मोहटे यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवशीय आंतरविदयालय गणित व विज्ञान प्रदर्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्षणात विदयार्थ्यांनी लेझर होम प्रोटेक्टेड,कचरा व्यवस्थापन,पाणी शुद्धीकरण,पाण्यापासून विद्युतधारा,इअर कुलर,गणितीय मॉडेल,दुषित पाण्यावर उपचार, टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तू, इअर फिल्टर,पवन ऊर्जा,आदर्श गाव,हार्ट वर्किंग,किडणी वर्किंग, ह्युमन ब्रेन, मॅट मॅझिक,मॉर्डन पेरीओडीक टेबल,चंद्रयान यांसारख्या माध्यमिक विभागात १७ व उच्च माध्यमिक विभागातील २७ उपकरणे प्रदर्षणात मांडले होते.
यावेळी उद्घाटनप्रसंगी खिरविरे ग्रामपंचायतीचे सदस्य राजु शेंगाळ यांसह डॉ.राहुल देशपांडे,मनिषा देशपांडे,तुकाराम बेणके,रफिक मनियार,विष्णु सुर्यवंशी,प्राचार्य मधुकर मोखरे यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी सर्व उपकरणांची पाहणी करून माहीती घेतली.