अहमदनगर

अकोलेत एसटी आगारचा गलथान कारभार डिझेल संपल्याने एसटी बसेस थांबल्या!

अकोले प्रतिनिधी

एसटी महामंडळाच्या अकोले आगाराचा गलथान कारभार उघड झाला आहे एसटी बसेस साठी आगारात डिझेल संपल्याने सर्व गाड्या जागे वरच थांबल्या आहे यामुळे अकोल्यात महिला जेष्ठ नागरिक विद्यार्थी आशा प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे आज डिझेल नसल्याने मुक्कामी जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या
अकोले एस टी च्या कारभाराच्या ढिसाळ नियोजनाचे पितळ आज उघडे पडले यामुळे अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
अकोले तालुका आदिवासी तालुका ओळखला जातो. जिल्ह्यात सर्वांना दळणवळणाचा डोंगराळ व सर्वदुर असा परिसर आहे. अकोले एस टी डेपोवर येथिल सर्वांचे प्रवासी जीवन अवलंबून आहे. अकोले डेपोत आज एस टी बसला डिझेल नसल्याने प्रवाशांचे चांगलीच तारांबळ उडाली. कोतुळ, समशेरपुर, राजुर, घाटगर या बाजारपेठांच्या गावापर्यंत व शाळा, विद्यालयातून विद्यार्थ्यांना गावाकडे व घरी पोहचणे अवघड झाले

ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेनकर , रमेश राक्षे, महेश नवले, भाऊसाहेब वाकचौरे, यांनी दिली याबाबत संताप व्यक्त केला . उद्याही डिझेल चा पुरवठा होईल की नाही याची खात्री नसल्याने प्रवाशांसाठी पर्यायी उपाययोजना आवश्यक आहे अकोले एस टी डेपोच्या ३५-४० बस उभ्या असून त्यांना डिझेल पुरवठा करण्यात यावा. विद्यार्थ्यांची व प्रवाशांची होणारे नुसकान व डेपोतील चालक, वाहक असे २००ते-२५० कर्मचारी उभे राहतील याचा भार सामान्य जनतेवर पडणार आहे. अकोले डेपोला सक्षम नियंत्रक नसल्यामुळे प्रवाशांचे व जनतेचे गैरसोय होत आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी अकोले ग्राहक पंचायत ने केली आहे अकोल्यातील आदीवासी भागातील जनतेचे या मुळे हाल होत आहे माँगील महिन्यात ही एकदा असा प्रकार झाला होता अकोले आगाराच्या अकोले या गलथान कारभाराबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मुंबई विभाग अध्यक्ष रामनाथ भोजने यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button