गणोरे येथील जनाबाई आंबरे यांचे निधन …

अकोले प्रतिनिधी
गणोरे ता. अकोले येथील वैकुंठवासी जनाबाई दारकु आंबरे यांचे दुःखत निधन झाले., असून त्यांचा दशक्रिया विधी दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी ठीक ८.०० वाजता आढळा तिरी गणोरे या ठिकाणी होणार आहे.
गणोरे गावातील जुन्या जाणत्या लोकांपैकी त्या एक व्यक्तिमत्व होत्या, जुन्या काळी बिडी व्यवसायाच्या माध्यमातून आपलं उदरनिर्वाह करत असे, बिडी व्यवसायाच्या कालावधीमध्ये उत्कृष्ट विडी कामगार म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले होते. अतिशय गरीब आणि मनमोकळ्या स्वभावाने त्या सर्वांमध्ये प्रिय होत्या. आंबरे पाटील कुटुंब हे त्यांचे माहेर कै. बाबुराव दारकु आंबरे यांच्या त्या भगिनी होत. कै. दारकु आंबरे व कै. पार्वताबाई आंबरे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांना एकूण ४ बहिणी व १भाऊ असा परिवार होता. त्यांचा विवाह निमज येथील गुंजाळ परिवारात झाला.
रे येथील माजी सरपंच श्री. के. बी. आंबरे यांच्या आत्या व स्वाभिमानी शेतकर रीसंघटनेचे युवक अध्यक्ष शुभम आंबरे यांच्या त्या आज्जी होत्या.त्यांना कोणतेही मुलं,मुली नसल्याने आंबरे कुटुंबच हेच त्यांचे सर्वस्व होते.
वै.जनाबाई दारकू आंबरे यांच्या स्मृती जपण्यासाठी आंबरे परिवाराकडून गणोरे येथील स्मशान भूमी येथे पिंडदान चौथरा बांधला असून त्या द्वारे त्यांच्या स्मृती जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेतील लहान मुलांना खाऊ चे वाटप करण्यात आले. सदैव व चिरंतन आठवण जपण्यासाठी आजीच्या नावाने अमर ,चिरंतन असे वट वृक्षाचे रोपण करण्यात आले आहे. तसेच आयुष्यभरात जी गोड साथ दिली त्या आठवणीत स्मशान भूमी परिसरात फणसाचे झाड लावण्यात आले आहेत. फणस जसे वरून काटेरी,टणक असते परंतु आता मध्ये अतिशय गोड असते असाच स्वभाव आज्जीचा असल्याने अगदी त्याच पद्धतीने फणसाचे झाड लावायचे आंबरे परिवार व नातेवाईक यांनी निर्णय घेतला. अश्या आमच्या आज्जीला ईहलोकीचा प्रवास पूर्ण करून दहा दिवस झालेत. आज्जीच्या परलोक प्रवास सुख ,समाधान,आणि चांगला व्हावा. म्हणून ह्या परिवाराने थोडे का होईना. असा सामाजिक उपक्रम राबविला. तसेच काही दिवसांपूर्वी आंबरे परिवाराच्या वतीने गावात जो काही वैकुंठ रथ बनवला त्यात इतर सहकारी यांचे बरोबर मोठा वाटा उचलत आपली सामाजिक बांधिलकी जपली. कै. सिताराम गोपाळा आंबरे ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ गावात दर्शनी भागात भव्य कमान उभारलेली आहे. कै.ज्ञानेश्वर गोपाळा आंबरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गावातील इयत्ता दहावी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना कायम ठेवीतून बक्षीस योजना सुरू केली आहे.हाच सामाजिक बांधिलकीचा वारसा ह्याही पुढे आंबरे परिवाराच्या वतीने असच सुरू असलेला सामाजिक वसा आणि वारसा असाच पुढे सुरू राहील, अशी ग्वाही आंबरे परिवाराच्या वतीने दिली.
कै.सिताराम गोपाळा आंबरे, कै. ज्ञानेश्वर गोपाळा आंबरे ,श्री.मच्छिंद्र गोपाळा आंबरे ,श्री.गोरख गोपाळा आंबरे यांच्या त्या भगिनी होत्या.
गणोरे गावचे माजी सरपंच श्री के.बी. आंबरे , विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री विवेक आंबरे,श्री.गोरख विष्णू आंबरे यांच्या त्या आत्या होत्या.तसेच दादाभाऊ पांडुरंग आहेर, सोपान नेहे,भगवान नेहे यांच्या मावशी होत्या.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे,शुभम आंबरे, यांच्या त्या आज्जी होत्या. वै.जनाबाई दारकु आंबरे यांना धर्मवीर संभाजी नगर, लक्ष्मी तरण मित्र मंडळ, पिरबाबा तरुण मित्र मंडळ,अंबिका माता पायी दिंडी सोहळा,ओम साई राम मेडिकल, गावातील सर्व मित्र मंडळ,भजनी मंडळ,सर्व शैक्षणिक संस्था, बळीराजा दूध उत्पादक संस्था, बळीराजा ऑनलाईन सर्व्हिस, नातेवाईक,आप्तेष्ट, सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सहकारी सेवा सोसायटी ,चेअरमन, व्हा चेअरमन, संचालक मंडळ,सर्व संस्था पदाधिकारी, कर्मचारी, स्वाभिमानी शेतकरी संघटना,गणोरे ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने आज्जी ला भावपूर्ण श्रद्धांजली…!
तसेच दशक्रियेनिमित्त हभप राजेंद्र महाराज नवले यांची प्रवचन सेवा होईल.
ह्यावेळी अकोले तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे, शिवसेना ज्येष्ठ नेते तथा माजी पोलीस आयुक्त श्री मधुकर शंकर तळपाडे, ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री एकनाथ ढाकणे, तसेच जिल्हा भरातील अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक,शैक्षणिक, समाजकारण आदी क्षेत्रातील मान्यवरांनी सांत्वन पर भेट दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शोक व्यक्त केला.