इतर

केळुंगण येथील मांगे कुटुंबाला रोटरी क्लब अकोले सेंट्रलचा मदतीचा हात,


अकोले प्रतिनिधी –

अकोले तालुक्यातील केळुंगण येथील रामचंद्र मांगे यांचे घराला लागलेल्या आगीत सर्व संसारोपयोगी वस्तू,धान्य,कपडे,सर्व साहित्य जळून खाक झाले होते. त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर पडले होते.


सामाजिक बांधिलकीतून रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीने या कुटुंबीयास संसारोपयोगी साहित्य, ब्लॅंकेट, महिलांना साड्या,लहान मुलांना गणवेश मांगे परिवाराकडे रक्षाबंधनाच्या दिवशी सुपूर्त केले. करण्यात आले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने मांगे कुटुंबियातील बहिणींना साडी व लहान मुलांना गणवेश व संसारोपयोगी साहित्य भेट दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. अद्याप पर्यंत कोणतीही शासकीय मदत मिळाली नसल्याची खंत मांगे कुटुंबियातील महिलांनी बोलून दाखविली.


यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते म्हणाले की, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ.सुरेश साबू यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल हा सामाजिक व विधायक उपक्रम राबवत आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून मांगे परिवाराला मदत करण्याचा प्रयत्न केला.अजूनही काही गरज लागली तर ती करण्यासाठी प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले .
यावेळी रोटरी क्लबचे पब्लिक इमेज डायरेक्टर हभप दीपक महाराज देशमुख यांनी रोटरी क्लबच्या कार्याची माहिती देत रोटरी क्लब अकोले हा नेहमीच आपत्कालीन संकटात मदतीसाठी पुढे राहील असे सांगितले .

तर माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे यांनी मांगे कुटुंबीयाच्या जळीत घटनाक्रमाची माहिती दिली. या परिवाराची हलाखीची परिस्थिती लक्षात घेता समाजातील दानशूर व्यक्तींना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आवाहन केले होते. त्याला समाजातील काही दानशूरांनी मदत केली. तसेच रोटरी क्लबने केलेल्या मदतीबद्दल त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य,माजी अध्यक्ष सचिन देशमुख व सचिन शेटे, राजूरचे उपसरपंच संतोष बनसोडे,पत्रकार विलास तुपे, केळुंगण येथील
कार्यकर्ते सूर्यकांत देशमुख तसेच मांगे परिवारातील सदस्य, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button