इतर

नगर कल्याण रोडवर जखणगाव, हिंगणगाव, हमीदपूर, टाकळी खादगाव, निमगाव वाघा नेप्ती ग्रामस्थांचा रस्ता रोको.


अहमदनगर – जखणगाव येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणी साठी नगर कल्याण महामार्गावर जखणगाव येथे आज सकाळी दहा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सहआरोपीना अटक न झाल्यास दोन दिवसानी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी पोलीस प्रशासनाला दिला.सहआरोपीना अटक केली जाईल असे आश्वासन यावेळी तालुका पोलीस स्टेशन चे निरिक्षक प्रल्हाद गिते यानी दिला.


जखणगाव येथे पाच सहा दिवसा दिवसापुर्वी अल्पवयीन मुलीवर अतिप्रंसग करण्याचा प्रयत्न केला. याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपीला अटक करण्यात आली. मात्र एफआय आर मधील क्र६७४ मधील सह आरोपीना तात्काळ अटक न झाल्यास ग्रामस्थ वतीने रस्ता रोको आंदोलन करण्याबाबतचे निवेदन दिले होते मात्र सह आरोपीना अटक न झाल्यामुळे आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.


जखणगाव मधील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसग करण्याचा प्रयत्न करण्यात आला व सदर गुन्हा दडपण्यासाठी मुलींच्या कुंटुबीयांना धमकी व अमानुष मारहाण करण्यात आली. याबाबत तालुका पोलीस स्टेशनमध्ये ६७४ क्रंमाक नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात मुख्य आरोपीना अटक करण्यात आलेली आहे.पंरतु सह आरोपी अध्यापही मोकाट फिरत आहेत व अप्रत्यक्षपणे मुलींच्या कुंटुबी यावर दबाव व धमकी देण्याचा प्रकार घडत आहेत. हि अतिशय गंभीर बाब असून प्रशासना तर्फ याची गंभीर दखल न घेतल्यामुळे सह आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत.बेलापूर अरण कोलकत्ता येथील डॉक्टर वर झालेल्या अत्याचाराने सर्व भयभीत झालेले असताना पोलीस प्रशासनातर्फ या घटनेची गंभीर दखल न घेता आरोपीना मोकाट सोडून मुलीला किंवा तिच्या कुंटुबियांना काही इजा किंवा त्रास झाल्यास प्रशासन जबाबदार असेल . सदर घटनेचा गांभीर्य ओळखून इतर सह आरोपींना तात्काळ २४ तासाच्या आत करावी. असे निवेदन दिले होते.
. यावेळी सरपंच डॉ. सुनील गंधे माजी जिल्हा परीषद सदस्य संदेश कार्ले, पचायत समिती माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, समता परिषद तालुका अध्यक्ष रामदास फुले, बाळासाहेब कर्डीले, बाळासाहेब शहाणे, मनोहर काळे, तात्यासाहेब कर्डीले, संजय जपकर, प्रकाश कुलट, राजू नरवडे, बी.आर. कर्डीले, रावी शिंदे, बाळासाहेब थोरात, बाबासाहेब भिसे, विजय जगताप, सुरेश नरवडे, माजी सरपंच राजाराम कर्डीले,सह गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठया प्रमाणात तैनात होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button