फोफसंडीत रंगला विशेष गुणगौरव व काव्यमैफल कार्यक्रम सोहळा

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील फोफसंडीत या अतिदुर्गम खेड्यात विशेष गुणगौरव व काव्यमैफल कार्यक्रम सोहळा उत्साहात पार पडला
फोफसंडी या अतिदुर्गम खेड्यात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला . कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत मंगेश कोंडार सर यांनी केले.प्रस्ताविक भगवंता घोडे सरांनी केले.राजू घोडे सरांनी अनुमोदन केले.यशवंत घोडे सरांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आदिवासी क्रांतिकारक प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.नंतर गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला.काव्यवाचन मध्ये नामवंत कवींनी आपल्या कविता सादर केल्या.आदिवासी संस्कृती वर आधारित भलरी गायन उमाबाई वळे आजींनी सुंदरपणे सादर केले. त्यामध्ये निसर्ग कवी तानाजी सावळे यांनी आपली निसर्गा विषयी कविता सादर केली.

फोफसंडीचे कवी यशवंत घोडे यांनी शोकांतिका कविता सादर केली त्यानंतर हरिभाऊ घोडे गुरुजी यांनी आपले मनोगत व कविता सादर केली .यानंतर श्रीकांत चौगुले( इतिहास व लेणी तज्ञ,पुणे) यांनी फोफसंडी गावचा गुण गौरव केला.
कार्यक्रम अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे म्हणाले,”फोफसंडी गाव जगाच्या नकाशावर कसे जाईल यासाठी प्रयत्न करावे.पर्यटन विकसित होऊन स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी आहे.
विशेष अतिथी श्रीकांत चौनगुले म्हणाले,”फोफसंडी या गावाला येऊन अतिशय आनंद झालआहे.फोफसंडीत आल्यावर सुध्दा येथिल निसर्गपाहुन फोफसंडीला का माँरेशिअस म्हणतात.त्याच्या माध्यमातून आज काव्यमैफल,विद्यार्थी सत्कार,ग्रामस्थ सत्कार,मुलांना खाउ वाटप केला.यामुळे समाधान वाटले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी वादळकार प्रा राजेंद्र सोनवणे सर यांनी गावात सरकारी दवाखाना व बस सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.सौ.शालीनी सहारे मुलांसाठी गोष्टी पुस्तके देण्याचे आश्वासन दिले. नक्षत्रांचं देणं काव्यमंच कवी ग्रुप च्या वतीने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व खाऊ देण्यात आला
या कार्यक्रमासाठी जि. प.शाळा फोफसंडी येथील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.8
या कार्यक्रमासाठी गावचे ग्रामसेवक गोडे भाऊसाहेब, सरपंच सुरेश वळे,उपसरपंच संजय घोडे ,ग्रा.सदस्य दगडू भगत,ग्रा.सदस्या मिना मुठे मा.पो सोमा वळे, हाॅटेलचे मालक दत्तात्रय मुठे, पोपट वळे, आशा वर्कर कांताबाई घोडे, वाळीबा वळे, बुधा वळे ,सखाराम वळे ,बुधा घोडे, सिताराम घोडे,कोंडीबा घोडे ,भिवा वळे, ,नक्षत्राचं देणं काव्यमंचचे इतर 30 मान्यवर कवी होते भगवंता घोडे सर यांनी आभार मानले.विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
